News18 Lokmat

खूशखबर! सोन्याच्या किमतीत घसरण, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

Gold, Silver, Gold Price - सोनं-चांदी खरेदी करायची असेल तर चांगली बातमी आहे. सोनं स्वस्त झालंय. जाणून घ्या आजचा दर

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 05:34 PM IST

खूशखबर! सोन्याच्या किमतीत घसरण, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

मुंबई, 9 जुलै : आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली घसरण आणि घरगुती स्तरावर मागणी कमी झाल्यानं आज ( 9 जुलै ) दिल्ली सराफा बाजारात सोनं 600 रुपयांनी स्वस्त झालं. चांदीच्या किमतीतही 48 रुपयांची घसरण आलीय. जुलै महिन्यातली सोन्याच्या किमतीतली ही सर्वात मोठी घसरण आहे. बजेटमध्ये सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या सीमा शुल्कात 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. शनिवारी सोन्यात 670 रुपयांनी वाढ होऊन 35,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोनं पोचलं.  बजेटच्या दिवशी सोनं 590 रुपयांनी वाढलं होतं. शनिवारी चांदीत 300 रुपयांनी वृद्धी होऊन 38,800 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

स्वस्त झालं सोनं आणि चांदी

दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 600 रुपयांनी कमी झाली होऊन 34,870 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आलीय. 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 600 रुपयांनी कमी होऊन 34700 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आलीय.

एके काळी ही कंपनी सोनिया गांधींनाही देत होती महिन्याला 2000

Loading...

का स्वस्त झालं सोनं?

तज्ज्ञांचं म्हणणं असं की सोन्याची मागणी कमी झाली. म्हणून किमतीत घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारातही किमतीवर दबाव आहे. पुढच्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होऊ शकते.

चांदी खरेदी करणं झालं स्वस्त

चांदी 48 रुपयांनी घसरण होऊन 38,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर आलीय. चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 81 हजार आणि 82 हजार रुपये प्रति शेकडा होता.

आजपासून 'या' कंपनीची स्कुटर आणि बाइक झाली महाग

बजेटमध्ये सोन्याच्या आयातीवरचे दर वाढण्याची घोषणा झालीय. तेव्हापासून दोन दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर सोमवारी ( 8 जुलै ) सोनं 35470 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिलंय. बजेटमध्ये सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या सीमा शुल्कात 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. शनिवारी सोन्यात 670 रुपयांनी वाढ होऊन 35,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोनं पोचलं.  बजेटच्या दिवशी सोनं 590 रुपयांनी वाढलं होतं. शनिवारी चांदीत 300 रुपयांनी वृद्धी होऊन 38,800 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,403.59 डाॅलर प्रति औंसवर होतं. चांदीत वृद्धी होऊन 15.05 डाॅलर प्रति औंस होती.

VIDEO : 'माझ्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी दिली होती'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...