लवकरच तुमच्या हातात असेल 20 रुपयांची नवी नोट, 'ही' असेल खासीयत

लवकरच तुमच्या हातात असेल 20 रुपयांची नवी नोट, 'ही' असेल खासीयत

RBI, Modi Government - लवकरच बाजारात 20 रुपयांची नोट येणार आहे. जाणून घ्या या नोटेची वैशिष्ट्य

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बऱ्याच नव्या नोटा बाजारात आल्या. 2000, 500, 200, 100, 50 रुपयांच्या नव्या नोटांनंतर आता तुमच्या हातात 20 रुपयाची नवी नोट लवकरच येणार आहे. या नोटेवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असेल आणि नोटेच्या मागच्या बाजूला देशाच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या एलोरा गुंफांचं चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 20 रुपयांची नवी नोट कानपूरच्या रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक ऑफिसमध्ये पोचलीय. लवकरच 20 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात पोचतील.

जुन्या नोटाही चलनात राहतील

या नोटेवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सांगितलं की, चलनात असणाऱ्या 20 रुपयांच्या नोटा तशाच राहतील. नव्या आल्या तरी त्या चालू शकतात.

20 रुपयात उघडा Post Office मध्ये खातं आणि मिळवा मोफत 'या' सुविधा

असा असेल नोटेचा पुढचा भाग

RBIनं आणलेल्या 20 रुपयाच्या नव्या नोटेच्या पुढच्या भागात महात्मा गांधींचं चित्र आहे. बाजूला नोटेचं मूल्य हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिलंय. सुरक्षा पट्टीवर भारत आणि RBI असं लिहिलंय.

नोटेच्या दुसऱ्या भागात गॅरन्टी क्लाॅज, गव्हर्नरची सही, आरबीआयचं चिन्ह, महात्मा गांधींचा फोटो असेल. शिवाय अशोक स्तंभही आहे. नोटेचा नंबरही आहे.

कार खरेदी करताय? मग सरकारनं बदललेले हे नियम पाहाच

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 'हे' आहेत बुधवारचे दर

असा दिसेल मागचा हिस्सा

नोटेच्या मागच्या बाजूला वर्ष. स्वच्छ भारतचा लोगो, त्याची प्रतिज्ञा असेल. नोटेच्या मागच्या बाजूला एलोरा गुंफेचं चित्र आहे. ही नोट 63 मिमी उभी आणि 129 मिमी लांब आहे. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक नव्या चलनामागे भारतीय संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या वास्तूंचं प्रतिक छापण्यात आलं आहे. या माध्यमातून भारतातील ऐतिहासिक वास्तूंचा गौरव करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं आहे.

VIDEO: पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, कोल्हापुरातल्या गावांना धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या