Elec-widget

स्वस्त सोनं खरेदी करायची संधी, 'ही' आहे मोदी सरकारची खास योजना

स्वस्त सोनं खरेदी करायची संधी, 'ही' आहे मोदी सरकारची खास योजना

Modi Government, Gold bond scheme - तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करायचंय? चांगली संधी आलीय ती जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. मोदी सरकारनं गोल्ड बाॅण्ड स्कीमचा दुसरा भाग लाँच केलाय. यामधून तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करू शकता. सरकारनं साॅवरेन गोल्ड बाॅण्डच्या दुसऱ्या भागाची विक्री सुरू केलीय. ही विक्री 12 जुलैपर्यंत सुरू राहील. त्यानंतर 16 जुलैला बाॅण्ड जारी केला जाईल. या वेळच्या बाॅण्डसाठी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 3,443 रुपये ठेवलीय. गुंतवणूकदारांना साॅवरेन बाॅण्डसाठी आॅनलाइन अर्ज केला आणि डिजिटल मोडवर पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळेल. अशा प्रकारे साॅवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये आॅनलाइन गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 3,393 रुपये असेल.

जाणून घेऊ या मोदी सरकारच्या गोल्ड बाॅण्ड स्कीमबद्दल -

1. ही स्कीम काय आहे? - साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात नोव्हेंबर 2015मध्ये झाली. यात तुम्ही सोनं खरेदी करून ठेवण्यापेक्षा साॅवरेन बाॅण्डमध्ये गुंतवणूक केली, तर तुमचा करही वाचतो.

खूशखबर! सोन्याच्या किमतीत घसरण, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

2. कशी खरेदी करायची गोल्ड बाॅण्ड स्कीम? - या बाॅण्डची विक्री बँका, स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ठराविक पोस्ट ऑफिस आणि एनएसई म्हणजे बीएसईद्वारे होईल.

Loading...

मिळतात हे 4 फायदे

1. आॅनलाइन पेमेंटवर जादा सवलत - अर्थमंत्रालयानं सांगितलं की भारत सरकारनं आरबीआयच्या सल्ल्यानं आॅनलाइन अर्ज आणि पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिलीय.

'राज ठाकरे आणि आंबेडकरांनी एकत्र येत भाजपला दणका द्यावा'

2. 2.5 टक्के वर्षाला व्याज - या योजनेअंतर्गत इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर 2.5 टक्के वर्षाला व्याज मिळेल.

3. भांडवली उत्पन्न करातही होऊ शकते बचत - बाॅण्डची किंमत सोन्याच्या किमतीतल्या अस्थिरतेवर अवलंबून असते. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या घसरणीमुळे गोल्ड बाॅण्डवर नकारात्मक रिटर्न मिळतात. या अस्थिरतेला कमी करण्यासाठी सरकार दीर्घ काळाचे गोल्ड बाॅण्ड जारी करते. याच्या गुंतवणुकीचा काळ 8 वर्ष असतो. पण तुम्ही 5 वर्षांनी तुमचे पैसे काढून घेऊ शकता. 5 वर्षानंतर पैसे काढल्यानंतर भांडवली उत्पन्न कर लावला जात नाही.

भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान हा खेळाडू फिरतोय क्रोएशिया आणि इटलीत

4. कर्ज मिळू शकतं -  गोल्ड बाॅण्ड पेपर कर्जासाठी वापरता येतो. हा पोस्ट आॅफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटप्रमाणे असतो.

VIDEO: नागपूर-जबलपूर महामार्ग ठरतोय वन्य प्राण्यांसाठी जीवघेणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...