मोदी सरकार देशात सुरू करणार दुबईसारखा मेगा शाॅपिंग फेस्टिवल

मोदी सरकार देशात सुरू करणार दुबईसारखा मेगा शाॅपिंग फेस्टिवल

Nirmala Sitaraman - अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज शाॅपिंग फेस्टिवलची घोषणा केली. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थव्यवस्थेला आलेल्या सुस्तीवर योजलेले उपाय सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बऱ्याच घोषणा केल्या. त्यापैकी एक महत्त्वाची घोषणा केलीय. ती म्हणजे आता भारतात दुबईप्रमाणे दर वर्षी मेगा शाॅपिंग फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे. यात हिरे, दागिने, हस्तकला, योग, पर्यटन अशा थिम्स ठेवल्या जातील. अर्थमंत्री म्हणाल्या, मेगा फेस्टिवलच्या आयोजनामुळे टेक्सटाइल आणि चामड्याच्या उद्योगाला चालना मिळेल. सोबत योगा टुरिझमलाही प्रोत्साहन मिळेल.

महागाई नियंत्रणात

अर्थमंत्री म्हणाल्या की महागाई नियंत्रणात आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमती वाढल्यानं ऑगस्टमध्ये महागाई दर 3.21 टक्के झाला. जो जुलैमध्ये 3.15 टक्के होता. आरबीआयचं लक्ष्य महागाई 4 टक्क्यापर्यंत ठेवायचं आहे.

पत्रकार परिषदेत झाल्या मोठ्या घोषणा

निर्यातीचा अवधी कमी करण्याची योजना

नवा प्लॅन डिसेंबरमध्ये लागू

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मेगा फेस्टिवल

4 शहरांमध्ये होणार मेगा फेस्टिवल

निर्यात इन्शुरन्ससाठी प्रत्येक वर्षी 1700 कोटी रुपये

सप्टेंबरच्या शेवटापर्यंत जीएसटी रिफंड

इलेक्ट्राॅनिक रिफंड लागू करणार

लेबर इंटेन्सिव सेक्टरला प्राथमिकता

निर्यात अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं जाईल

निर्यात ई रिफंड या महिन्याच्या शेवटी लागू

छोट्या टॅक्स डिफाॅल्टवर खटला नाही

19 सप्टेंबरला PSU बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक

इन्कम टॅक्समध्ये ई असेसमेंट स्कीम लागू

बँकांचा क्रेडिट आउटफ्लो वाढलाय

घरासाठी उचलली नवी पावलं

अर्थमंत्री म्हणाल्या घर खरेदी करण्यासाठी फंड मिळावा म्हणून स्पेशल विंडो बनवली जाईल. तिथे तज्ज्ञ मंडळी काम करतील. त्या म्हणाल्या, बजेटमध्ये अनेक पावलं उचलली गेलीयत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1.95 कोटी लोकांना याचा फायदा झाला.

 

Published by: Sonali Deshpande
First published: September 14, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading