मुंबई, 30 जुलै : या वर्षी LICनं बऱ्याच पाॅलिसी सुरू केल्यात. त्यातलीच एक आहे ती म्हणजे जीवन शांती पाॅलिसी. यात 50 वर्षापर्यंतचा व्यक्ती पाॅलिसी घेऊ शकतो.या पॉलिसीची खासियत म्हणजे यात निवृत्तीवेतन मिळते. म्हणजे समजा एखाद्या 50 वर्षाच्या व्यक्तीने पॉलिसीमध्ये 10,18,000 रुपये लावले तर त्याला लगेच 65600 रुपयांची वार्षिक पेन्शन मिळतं. पण त्यासाठी काही नियमही आहेत.
एसआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा म्हणाले, जीवन शांती योजना ही एक नॉन-लिंक पेन्शन योजना आहे. तसेच सिंगल प्रीमियम वार्षिकी योजना आहे ज्यात तत्काल वार्षिकी या स्थगित वार्षिकी योजना निवडण्याचा पर्याय आहे.
राज्य सरकारची नवी योजना, 10 लाख नोकऱ्या होणार उपलब्ध
ऑनलाइन आणि ऑफलाइन निवडा पाॅलिसी
ही पाॅलिसी ऑफलाइनप्रमाणे ऑनलाइनही घेतली जाते. या पाॅलिसीचा फायदा व्यक्ती आणि कुटुंबाला मिळतो.
आता काही मिनिटातच तुमचे आवडते पदार्थ घरपोच, 'ही' कंपनी करणार फूड डिलिव्हरी
पॉलिसीची खासीयत
एलआयसी एजंट राजेश कुमार त्यागी यांच्या मते, 'जीवन शांती' हे एक उत्कृष्ट उत्पादन आहे. ही एक सिंगल प्रीमियम डिपॉझिट पेन्शन योजना आहे.
- कर्ज सुविधा
- कोणत्याही मेडिकल कागदपत्रांशिवाय तुम्ही तीन महिन्यानंतर विमा कधीही बंद करू शकता
- 1 ते 20 वर्षे कोणत्याही वेळी पेंशन सुरू
- संयुक्त जीवन पर्यायामध्ये कोणत्याही जवळच्या नातेवाईकाचा समावेश असू शकतो
- 5 वर्षे आणि 20 वर्षांच्या दरम्यान पेंशन दर, 9.18 टक्के ते 1 9 .23 टक्यापर्यंत जीवनपर्यंत गॅरेंटी
- आयकरात सवलत
पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती
कोणाला किती रक्कम मिळेल?
जर 50 वर्षांच्या व्यक्तीनं पॉलिसीमध्ये 10,18,000 रुपये ठेवले तर त्याला लगेच 65,600 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. परंतु वर्ष जशी वाढतील तशी किती रक्कम मिळेल ते पाहू.
1 वर्षानंतर - 69300 वार्षिक
5 वर्षांनंतर - 9 1800 वार्षिक
10 वर्षांनंतर - 128300 वार्षिक
15 वर्षांनंतर - 6 9 500 वार्षिक
20 वर्षांनंतर - 1 9 2300 वार्षिक
LIC ची ही पाॅलिसी कोण घेऊ शकतं?
ही पाॅलिसी कमीत कमी 30 वर्ष आणि जास्तीत जास्त 85 वर्षापर्यंतच्या व्यक्ती घेऊ शकतात. जीवन शांती प्लॅनमध्ये कर्ज पेंशन सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर मिळतं. तर पेंशन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनी ती सरेंडर करता येते.
VIDEO: 'फक्त 4 नाही तब्बल 50 आमदार भाजपच्या पाईपलाईनमध्ये'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC