ब्रिटनची 259 वर्ष जुनी कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत रिलायन्स रिटेल

मनिकंट्रोलकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांमधली बातचीत खूप पुढे गेलीय.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 08:19 PM IST

ब्रिटनची 259 वर्ष जुनी कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत रिलायन्स रिटेल

मुंबई, 17 एप्रिल : रिलायन्स रिटेल ब्रिटनची सर्वात जुनी खेळण्याची कंपनी हॅमलेज ( Hamleys )ला खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मनिकंट्रोलकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांमधली बातचीत खूप पुढे गेलीय. हॅमलेज हा खेळण्यांचा प्रसिद्ध ब्रँड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हॅमलेजला चिनी पॅरेंट कंपनी विकायची आहे.

रिलायन्स रिटेल खरेदी करणार Hamleysचा कारभार

रिलायन्स रिटेलची Hamleysच्या मालकाशी बातचीत अंतिम टप्प्यात आहे. शिवाय चायनीज कंपनी सी बॅनरबरोबरही बातचीत सुरू आहे. हॅमलेज ही ब्रिटिश कंपनी आहे. ही कंपनी खेळणी बनवते.

कारभार वाढवण्याकडे कंपनीचा कल

3 वर्षात कंपनीची भारतात 200 स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. भारतात आतापर्यंत 50 स्टोअर्स आहेत. सी बॅनरनं 2015मध्ये Hamleys खरेदी केली होती. ही खरेदी 100 मिलियन पाऊंडला झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीनं मात्र अशा बातम्यांवर काही प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. कंपनी इतर पर्यायही शोधतेय.

Loading...

हॅमलेज या कंपनीची स्थापना लंडनमध्ये 1760मध्ये झाली. हेमलेजची जगभरात 129 स्टोअर्स आहेत. लंडनबाहेरही कंपनीची स्टोअर्स आहेत. त्यात चीन, जर्मनी, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व इथे कंपनीची स्टोअर्स आहेत.


VIDEO: सांगलीत भाजपच्या प्रचारासाठी आता वासुदेवच आला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2019 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...