इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला द्यावी लागणार या 7 गोष्टींची माहिती

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला द्यावी लागणार या 7 गोष्टींची माहिती

आर्थिक वर्ष 2018-19साठी नवा आयकर रिटर्न फाॅर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं प्रसिद्ध केलाय. यावेळी तुम्हाला ITRमध्ये अनलिस्टेड शेयर्सची माहिती देणं गरजेचं झालंय.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : आर्थिक वर्ष 2018-19साठी नवा आयकर रिटर्न फाॅर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं प्रसिद्ध केलाय. यावेळी तुम्हाला ITRमध्ये अनलिस्टेड शेयर्सची माहिती देणं गरजेचं झालंय. गेल्या वर्षाप्रमाणे सॅलरी ब्रेकअपही सांगावा लागणार आहे. तुम्ही किती दिवस भारताच्या बाहेर आहात हेही नव्या फाॅर्ममध्ये नमूद करावं लागेल. नोकरदारांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी आयटीआर -1 फाॅर्म भरावा लागेल. गेल्या वर्षी आयटीआर 1 फाॅर्ममध्ये घराच्या मालमत्तेपासून मिळकतीपर्यंत सविस्तर माहिती मागितली होती.

ITR फाॅर्ममध्ये द्यावी लागणार ही माहिती

1. ITR-1 फाॅर्म ज्यांना भरावा लागतो ज्यांची मालमत्ता 50 लाख रुपये आहे. यात पगार, घर मालमत्ता आणि मिळणारं व्याज या गोष्टी असतात.

2. ITR फाॅर्म कंपनीचा संचालक किंवा अनलिस्टेड इक्विटी शेयरमध्ये गुंतवणूक असणाऱ्याला भरायची गरज नाही.

3. ITR-1 स्टँडर्ड डिडक्शनच्या पर्यायासोबत येतं.ITR भरताना 2018-19मध्ये तुम्ही स्टँडर्ड डिडक्शनसाठी 40 हजार रुपयांचा दावा करू शकता.

4. तुमच्याकडे घर असेल तर तुम्हाला ITR-1मध्ये हे सांगावं लागेल की या घराचे मालक तुम्ही स्वत: आहात किंवा तुम्ही ते घर विकलंत.

5. तुम्हाला या आर्थिक वर्षात तुम्हाला दुसरीकडून मिळणाऱ्या मिळकतीची माहिती द्यावी लागणार आहे. यात बँक अकाऊंटमधून मिळणारं व्याज, फिक्स्ड डिपाॅझिट या गोष्टी आहेत.

6. गेल्या वर्षाप्रमाणे तुम्हाला तुमच्या पगाराच्या ब्रेकअपची माहिती तर द्यावी लागणारच, शिवाय अलाऊन्स, इतर सुविधा इत्यादींचीही माहिती द्यावी लागेल.

7. तुम्हाला घर भाडं मिळत असेल आणि त्यामुळे करात सूट मिळत असेल तर ती माहिती तुम्हाला आयटीआर - 1ला द्यावी लागेल.

2014 मध्ये बारामती का जिंकता आली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं हे कारण

First published: April 5, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading