रोज करा 40 रुपयांची बचत आणि 'अशा' प्रकारे मिळवा 8 लाख

रोज करा 40 रुपयांची बचत आणि 'अशा' प्रकारे मिळवा 8 लाख

Mutual Funds, Investment - तुम्हाला मोठा फंड उभारायचा असेल तर रोज थोडी बचत करता येईल. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : तुम्ही रोज थोडे पैसे बचत करून गुंतवलेत, तर काही काळानंतर तुम्ही लखपती बनू शकता. लखपती होण्यासाठी म्युच्युअल फंड ( Mutual Fund ) उपयोगी पडतात. तुम्ही रोज 40 रुपये बचत केलीत, तर जास्त भारही वाटत नाही. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP )द्वारे गुंतवणूक केलीत, तर 8 लाख रुपयांचा फंड जमा करू शकता.

असा तयार होईल 8 लाखाचा फंड

तुम्ही रोज 40 रुपयांची बचत केलीत तर महिन्यात 1200 रुपये जमा होतील. तुम्हाला दर महिन्याला 1200 रुपये चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक तुम्हाला 15 वर्ष करावी लागेल. बाजारात अनेक म्युच्युअल फंड्स आहेत, जे 15 वर्षांत 15 टक्के दर वर्षी रिटर्न देतात. तुम्हाला इतकं रिटर्न मिळालं तर तुमच्याकडे 8 लाख रुपयांचा फंड तयार होईल.

खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत सोमवारचे दर

किती होईल फायदा?

तुम्ही म्युच्युअल फंडात 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करत असाल, तर एकूण गुंतवणूक 2,16,000 रुपये होईल. SIP ची व्हॅल्यू 8,02,208 रुपये असेल. तुम्हाला 5,86,208 रुपयांचा फायदा होईल.

ATM मधून फक्त पैसे नाहीत तर 'या' 8 सेवाही मोफत मिळतात

या फंडात 15% रिटर्न

काही फंड्स चांगले रिटर्न देतात. म्हणजे आदित्या बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडात 15 वर्षांत 15.20 टक्के, डीएसपी इक्विटी ऑपाॅर्च्युनिटी फंडाच 14.67 टक्के, फ्रँकलीन इंडिया प्रायमा फंडात 15.07 टक्के रिटर्न मिळतात.

लिक्विड फंड्स जास्त फायदेशीर 

कमी काळासाठी गुंतवणूक करणारे फंड लिक्विड मानले जातात. लिक्विड फंडाला मनी मार्केट फंडही म्हटलं जातं. लिक्विड फंडात काही दिवसांपासून काही आठवडे गुंतवणूक करणं शक्य असतं. जास्त पैसे मिळाले तर या फंडात टाकले जातात. या फंडांना एक्झिट लोड लागत नाही.

B.Sc. झालेल्यांना रेल्वेत व्हेकन्सी, 85 जागांवर भरती

लिक्विड फंडातून रक्कम त्वरित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. या फंडात तुम्ही थोड्या दिवसांकरता गुंतवणूक करू शकता. यातली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

VIDEO: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भूकंप; पवारांच्या जवळचाच नेता करणार भाजपात प्रवेश

Published by: Sonali Deshpande
First published: July 29, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading