1999 रुपयांत विमान प्रवास, इंडिगोच्या 'या' आहेत नव्या ऑफर्स

1999 रुपयांत विमान प्रवास, इंडिगोच्या 'या' आहेत नव्या ऑफर्स

Indigo, Flight - इंडिगो नव्या ऑफर्स आणि उड्डाणं घेऊन आलीय. जाणून घेऊ त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : इंडिगो विमानसेवा अनेक स्वस्त विमान उड्डाणं सुरू करतेय. त्यात दिल्ली, जोधपूर, अहमदाबाद ही नाॅन स्टाॅप उड्डाणं सुरू करतेय. नव्या मार्गाचे दर 1999 पासून सुरू होतायत. जोधपूर इंडिगोचं 56वं डेस्टिनेशन आहे.

लवकरच सुरू होणार मुंबईहून सिंगापूर,बँकाॅकला विमान उड्डाणं

इंडिगोनं आधीच कोलकता ते शिलाँग नवं उड्डाणं सुरू केलंय. इंडिगो 22 ऑगस्टपासून मुंबई-सिंगापूर मार्गावर आणि मुंबई - बँकाॅक मार्गावर रोज नाॅन स्टाॅप उड्डाण सुरू करतंय. याशिवाय दिल्ली आणि मुंबईला जोडणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करतायत. विमानकंपनीनं दिल्ली-जेद्दा, मुंबई-कुवेत आणि मुंबई-दुबई या मार्गावर विमानं उडतील. इंडिगो आपल्या नव्या मार्गाचा विस्तार करतंय. जूनच्या शेवटी इंडिगोकडे 235 विमानं होती. ती 70 ठिकाणी जातात.

सोनं पुन्हा एकदा कडाडलं, 'हे' आहेत बुधवारचे 10 ग्रॅमचे दर

स्वस्त दरात प्रवास करवणाऱ्या इंडिगोनं सांगितलं की, 25 जुलै आणि 5 ऑगस्टला इंडिगो दिल्ली ते जेद्दा आणि मुंबई ते कुवेत अशी रोजची नाॅन स्टाॅप उड्डाणं सुरू करतंय. याशिवाय वाढती मागणी लक्षात घेता कंपनी मुंबई-दुबईच्या मधे तिसरं नाॅन स्टाॅप उड्डाण सुरू करणार आहे.

कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी कायद्यात बदल, 'हे' आहेत नवे 15 कडक नियम

इंडिगोचा डोमॅस्टिक एअर पॅसिंजर मार्केटमध्ये 50 टक्के हिस्सा

इंडिगो भारतातली प्रमुख विमान कंपनी आहे. डोमॅस्टिक एअर पॅसिंजर मार्केटमध्ये तिचा 50 टक्के हिस्सा आहे. गेल्या तिमाहीत इंटरग्लोब एव्हिएशननं 20,31,203.14 कोटी रुपये नफा मिळवलेला.

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

इंडिगो नेहमीच आपल्या प्रवाशांसाठी ऑफर्स घेऊन येते. इंडिगो ( IndiGo ) नं उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी धमाकेदार ऑफर आणली होती. यात देशात विमान प्रवास करायचा असेल तर तिकिटाची किंमत 999 रुपयांनी सुरू होत होती. तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचं तिकीट 3499 रुपयांनी सुरू होत होतं.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या पुढे आरक्षणाचा पेच वाढणार, धनगर समाजाने दिला हा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: indigo
First Published: Jul 24, 2019 08:07 PM IST

ताज्या बातम्या