'अशा' प्रकारे भरू शकता फक्त 7 मिनिटांत ITR, इन्कम टॅक्सची नवी सुविधा

Income Tax, ITR - इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं ITR भरायला सोपं जावं म्हणून नवी सुविधा सुरू केलीय

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 04:47 PM IST

'अशा' प्रकारे भरू शकता फक्त 7 मिनिटांत ITR, इन्कम टॅक्सची नवी सुविधा

मुंबई, 02 ऑगस्ट : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं कर भरणाऱ्यासाठी खास सुविधा सुरू केलीय. करदाते आता ई फायलिंगद्वारे रिटर्न फाइल करू शकतात. ही एक नवी सुविधा सुरू झालीय. https://www.incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर ही सेवा आहे. याला ई फायलिंग लाइट असं नाव दिलंय.

ई फायलिंग लाइट या नव्या सेवेचा वापर

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलं की, करदात्यांसाठी ई फायलिंग लाइट सुरू करतंय. तुम्ही होम पेजवर जाऊन ई फायलिंग लाइट बटण दाबून याचा वापर करू शकता. सर्व सेवांबरोबर ई फायलिंग पोर्टलला पोर्टल लाॅगइन बटन दाबून वापरता येईल.

अबब! 'हे' सेलिब्रिटी घेतात सर्वाधिक मानधन, TOP 100मध्ये फक्त 'हा' एकच भारतीय

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की वेब पोर्टलवर 'लाइट' टॅब दिलाय. करदात्यांनी एकदा आपल्या पेजवर ऑनलाइन आयकर रिटर्न आणि 26एएस भरणं आवश्यक आहे.

Loading...

आधीचा भरलेला ITR पाहता येतो

करदाता पहिल्यांदा भरलेला रिटर्न किंवा एक्सएमएल फाॅर्म डाउनलोड करू शकतात. पहिल्यांदा भरलेला रिटर्न पाहू  शकतात.

सरकारनं 'या' पदासाठी मागवलेत अर्ज, महिना 2.25 लाख रुपये पगार

त्यांनी सांगितलं की वर्कलिस्ट, प्रोफाइल सेटिंग, ई प्रोसिडिंगसारखे टॅब या नव्या ई फायलिंग लाइट टॅबवरून हटवले आहेत. यामुळे करदात्यांना ITR भरणं सोपं जाईल. आता 31 ऑगस्ट रिटर्न भरायची शेवटची तारीख आहे.

मोदी सरकारला धक्का! भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावर मोठी घसरण

ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

पावसाळी सहलीचा प्लान करताय, 'या' धबधब्यावर नक्की जा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Aug 2, 2019 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...