जगभरातल्या देशांवर घोंघावतंय 'हे' संकट, भारतावर काय होईल परिणाम?

जगभरात 2019 आणि 2020मध्ये आर्थिक व्यवस्थेवर संकट घोंघावतंय.आयएफएमच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी येत्या काळात नाजुक परिस्थिती असेल, असं म्हटलंय.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 02:44 PM IST

जगभरातल्या देशांवर घोंघावतंय 'हे' संकट, भारतावर काय होईल परिणाम?

जगभरात 2019 आणि 2020मध्ये आर्थिक मंदीचं संकट घोंघावतंय.आयएफएमच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी येत्या काळात नाजुक परिस्थिती असेल, असं म्हटलंय.

अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजनं सांगितलंय की जागतिक बँकेनं आर्थिक मंदीबद्दल सावध केलंय. या मंदीची कारणंही सांगितली आहेत. ती आहेत, वाढतं कर्ज, ढासळती बँकिंग सिस्टिम आणि अमेरिका-चीनमधलं ट्रेड वाॅर.

जागतिक अर्थव्यवस्थेत 40 टक्के हिस्सा नव्या बाजारपेठांतून येतो. यात धोकाही असतो. अशा बाजारांमध्ये डाॅलर आणि परदेशी चलनाचा दबदबा असतो. अशा परिस्थितीत अमेरिका व्याज दर वाढवतं. व्यवस्थेतून पैसा बाहेर जायला लागतो. बाजार कमकुवत होतो. तुर्की आणि अर्जेंटिनात असंच झालं.

Loading...

अमेरिका आणि चीन एकमेकांच्या उत्पादनांवर कर लावतंय.चीननं अमेरिकन मांस आणि भाज्यांवर, तर अमेरिकेनं चीनमधून येणारं स्टील, कापड यावर कर लावलाय. यामुळे अमेरिकेचा विकास दर 0.9 टक्के तर चीनचा विकास दर 0.6 टक्के कमी होऊ शकतो.

2008नंतर जगाच्या कर्जात 60 टक्के वाढ झालीय. विकसीत आणि विकसनशील देशांची अर्थव्यवस्था या कर्जात डुबलीय. जवळजवळ 1,82,000 कोटी डाॅलर कर्जात फसलेत. अर्थव्यवस्था फसली तर कर्ज फेडण्यासाठी पुंजी कुठून आणणार, हा प्रश्न आहे.

जगभराची बँकिंग व्यवस्था डगमगायला लागलीय. बँकेशिवाय इतर वित्तीय संस्था जास्त कार्यरत झाल्यात.

मार्च 2019मध्ये ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडेल. त्याचा परिणाम युरोपीय अर्थव्यवस्थेवर होईल.

रेटिंग एजन्सी मुडीजच्या सांगण्याप्रमाणे या मंदीत भारत आणि इंडोनेशियाची अर्थव्यवस्था चांगली राहील. या दोन्ही देशात चांगली वाढ होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2019 02:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...