मुंबई, 20 एप्रिल : देशभरात परीक्षांचे रिझल्ट लागतायत. मुंबईतही काही दिवसांनी 10वी 12वीचेही निकाल लागतील. पुढचे प्लॅन्सही तयार होत असतील. कुठेही शिक्षण घेतलं तरी फीचा खर्च असतो. पण बँकांकडून शिक्षणासाठी कर्ज मिळू शकतं. त्यासाठीच आम्ही तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय. त्याचा तुम्हाला उपयोग होईल.
आधी जाणून घ्या कुठल्या कुठल्या कोर्सेसना कर्ज मिळू शकतं. तुम्ही कर्ज घेऊन पूर्ण वेळ, अर्ध वेळ किंवा व्होकेशनल कोर्सेस करू शकता. याशिवाय इंजिनियरिंग, मॅनेजमेंट आणि आर्किटेक्ट यात ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कर्ज घेऊ शकता.
कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असायला हवं. याबरोबर भारत किंवा परदेशातल्या कुठल्याही वैध संस्थेच्या मान्यताप्राप्त काॅलेज किंवा विद्यापीठात अॅडमिशन घेतलेली असली पाहिजे. अर्ज करणाऱ्यानं 12वीची परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे.
शैक्षणिक कर्जासाठी तुमची शाळेतली गुणवत्ता महत्त्वाची ठरते. हुशार विद्यार्थ्यांना कर्ज मिळायला अडचण येत नाही. 12वीपर्यंतचे गुण पाहिले जातात. वडिलांची मिळकत कमी असली तरी विद्यार्थ्यांच्या गुणांकडे पाहून कर्ज दिलं जातं.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी सरकारच्याही शैक्षणिक योजना आहेत. तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्जावर सबसिडी मिळते.
शैक्षणिक कर्जासाठी अर्जदाराचं वय 18 ते 30 वर्षांच्या आत असायला हवं. विद्यार्थ्यांच्या कर्ज चुकवण्याच्या क्षमतेप्रमाणे बँक 10 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज देते.
तुम्हाला कुणी शैक्षणिक कर्ज देण्यास नकार देत असेल तर तुम्ही RBI कडे तक्रार करू शकता. कारण योग्य कारणाशिवाय कुठलीही बँक शैक्षणिक कर्ज नाकारू शकत नाही.
कर्जाच्या परतफेडीची सुरुवात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी करावी लागते. ती पाच ते सात वर्षांत पूर्ण करावी लागते. प्रत्येक बँकांचा कालावधी वेगवेगळा आहे.
भिवंडीत एक हंडा पाण्यासाठी महिलांचा राडा.. व्हिडिओने केली पुढाऱ्यांची पोलखोल