• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मोदी सरकारची तिजोरी भरली, एप्रिलमध्ये GST चं झालं 'इतकं' कलेक्शन!

मोदी सरकारची तिजोरी भरली, एप्रिलमध्ये GST चं झालं 'इतकं' कलेक्शन!

जीएसटी लागू झाल्यानंतर झालेलं हे सर्वात जास्त कलेक्शन आहे. मार्चमध्ये ते 1.06 लाख कोटी रुपये होतं.

 • Share this:
  मुंबई, 01 मे : मार्चनंतर एप्रिलमध्ये GST कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांच्या वर पोचलंय. नव्या आकड्यानुसार एप्रिलमध्ये जीएसटी कलेक्शन 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपये झालंय. जीएसटी लागू झाल्यानंतर झालेलं हे सर्वात जास्त कलेक्शन आहे.  मार्चमध्ये ते 1.06 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षात ( 2018-19 ) फक्त 4 महिन्यात GST कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालंय. खुशखबर, 'या' मोठ्या बँकेत FD वर मिळतोय 3 लाख रुपयांचा इन्शुरन्स एप्रिलमध्ये नवं रेकाॅर्ड जीएसटी कलेक्शन सर्वोत्तम पातळीवर पोचलंय एप्रिलमध्ये GST कलेक्शन 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपये झालंय. एप्रिल महिन्यात GST कलेक्शन 50,400 कोटी रुपयांहून जास्त 54700 कोटी रुपये झालं. VIVO ने लाँच केला 16 मेगापिक्सल सेल्फी असलेला स्मार्टफोन; अशी आहेत फिचर्स आणि किंमत सेंट्रल जीएसटी कलेक्शन 20400 कोटी रुपयांहून जास्त 21200 कोटी रुपये झालं. राज्य जीएसटी कलेक्शन 27500 कोटी रुपयांहून जास्त 28800 कोटी रुपये झालं. GST लागू झाल्यापासूनचा हा सर्वात जास्त GST आहे. भारताला मोठे यश, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित आर्थिक वर्ष 2018-19मधला GST एप्रिल 2018- 1.03 लाख कोटी रुपये मे 2018- 94,016 कोटी रुपये जून 2018- 95,610 कोटी रुपये जुलै 2018- 96,483 कोटी रुपये आॅगस्ट 2018- 93,960 कोटी रुपये सप्टेंबर 2018- 94,442 कोटी रुपये आॅक्टोबर 2018- 1,00,710 कोटी रुपये नोव्हेंबर 2018- 97,637 कोटी रुपये डिसेंबर 2018- 94,725 कोटी रुपये जानेवारी 2019- 1.02 लाख कोटी रुपये फेब्रुवारी 2019- 97,247 कोटी रुपये मार्च 2019- 1.06 लाख कोटी रुपये VIDEO : भावासाठी प्रियांका गांधींची अमेठीत विराट रॅली!
  First published: