'या' 8 कामांसाठी काढू शकता PF मधून पैसे

नोकरदारांसाठी पीएफचे पैसे खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा काही अडचणी येतात, तेव्हा हे पैसे उपयोगी पडतात.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 01:06 PM IST

'या' 8 कामांसाठी काढू शकता PF मधून पैसे

मुंबई, 17 एप्रिल : नोकरदारांसाठी पीएफचे पैसे खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा काही अडचणी येतात, तेव्हा हे पैसे उपयोगी पडतात. अनेकदा लोक PF मधून पैसे काढायला घाबरतात. आम्ही तुम्हाला सांगतोय अशा 8 परिस्थिती ज्यावेळी हे पैसे तुम्ही काढू शकता. काही वेळा तुम्ही PFचे पैसे पूर्ण काढू शकता, तर काही वेळा त्यातला थोडा हिस्सा काढू शकता.

1.गृहकर्जासाठी

यासाठी तुमची नोकरी 10 वर्ष झाली असली पाहिजे.

कुठलीही व्यक्ती आपल्या पगाराच्या 36 पट पीएफमधून पैसे काढू शकते.

यासाठी तुम्ही नोकरीत असताना एकदाच पीएफमधून पैसे काढू शकता.

Loading...

2.आजारावर उपचारासाठी

तुमच्या कुटुंबातलं कुणी आजारी पडलं तर पीएफमधून पूर्ण पैसे काढू शकता.

तुम्ही कधीही पैसे काढू शकता

1 महिना तुम्ही हाॅस्पिटलमध्ये आहात याचा पुरावा द्यावा लागतो.

आॅफिसमधून मिळणारं रजेचं सर्टिफिकेट दाखवावं लागतं

वैद्यकीय उपचारासाठी पैसे हवे असतील तर तुम्हाला आॅफिसमधून एक सर्टिफिकेट घ्यावं लागेल

पैसे काढण्यासाठी फाॅर्म 31सहित अर्ज करावा लागेल.

3. लग्नासाठी

खातेधारक आपली मुलं, भाऊ-बहीण यांच्या लग्नासाठी पैसे काढू शकतात.

त्यासाठी पुरावा द्यावा लागतो.

4. शिक्षणासाठी

फाॅर्म 31वर तुम्ही अर्ज करू शकता. पण पीएफमधले 50 टक्केच पैसे तुम्ही काढू शकता.

पूर्ण नोकरीच्या काळात तुम्ही 3 वेळी शिक्षणासाठी पैसे काढू शकता.

5.प्लाॅट खरेदी करण्यासाठी

प्लाॅट खरेदी करण्यासाठी पीएफचे पैसे वापरू शकता, पण त्यासाठी नोकरीच 5 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत. प्लाॅट पती,पत्नी दोघांच्या नावे रजिस्टर्ड हवा

प्लाॅट किंवा प्राॅपर्टी कुठल्याही वादात फसलेली नको. त्यावर कुठली कायदेशीर कारवाई सुरू नको.

यासाठी तुम्ही तुमच्या पगाराच्या 24पट पीएफ काढू शकता.

तुम्ही यासाठी नोकरीत एकाच वेळी पीएफमधून पैसे काढू शकता.

6.घर किंवा फ्लॅटसाठी

नोकरीत 5 वर्ष पूर्ण करायला हवी.

तुमच्या पगाराच्या 36 पट पीएफमधून पैसे काढू शकाल.

एकाच वेळी पैसे काढू शकता.

7. घर रिन्यूव्हेशन

यासाठी नोकरीत कमीत कमी 5 वर्ष पूर्ण हवेत.

पगाराच्या 12पट पैसे काढू शकता

अख्ख्या नोकरीत एका वेळीच तुम्ही पैसे काढू शकता.

8. निवृत्तीपूर्व

यासाठी तुमचं वय 54 वर्ष हवं

PFमधून तुम्ही 90 टक्के रक्कम काढू शकता. पण हे एकदाच करू शकता.


VIDEO : आशिष शेलारांसह भाजप उमेदवार रेल्वे स्थानकावर, प्रवाशांसोबत साधला संवाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...