SBI ची नवी सेवा, घरी बसून मिळवा 'हे' फायदे

SBI ची नवी सेवा, घरी बसून मिळवा 'हे' फायदे

SBI नं ग्राहकांसाठी नवी सेवा सुरू केलीय. त्यात 6 सेवा आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : देशाची सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. बँकेनं नुकतीच स्पेशल ग्राहकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू केलीय. यात वयानं 70 वर्षाहून मोठे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक यांच्यासाठी ही सुविधा आहे. यात कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा आहेत. RBI नं जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झालीय.

1. डोअर स्टेप बँकिंग सेवा - यात 6 सुविधा आहेत. यात कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म 15Hचं पिकअप यांचा समावेश आहे.

2. कसा घ्याल फायदा? - डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा केवायसी झालेले खातेधारकच घेऊ शकतात. बँकेजवळ तुमचा वैध मोबाइल नंबर आहे. एसबीआय शाखेच्या 5 किमीमध्ये तुमचं घर असायला हवं. जाॅइंट अकाऊंट, छोट्या मुलांचं अकाऊंट आणि नाॅन पर्सनल अकाऊंट याचा फायदा घेऊ शकत नाही.

3. द्यावी लागेल फी - ग्राहकांना या सेवेसाठी फी द्यावी लागेल. आर्थिक व्यवहार असेल, तर प्रति व्यवहार 100 रुपये द्यावे लागतील. आर्थिक नसलेल्या व्यवहारासाठी 60 रुपये द्यावे लागतील.

तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI शाखेत जाऊन रजिस्टर करावं लागेल. दिव्यांग व्यक्तींना मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागेल. अधिक माहिती https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services इथे मिळेल.

VIDEO: आगीशी खेळण्याची जीवघेणी परंपरा, इथं एकमेकांवर फेकतात पेटत्या मशाली

First published: April 22, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading