7वा वेतन आयोग : शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 'हा' मोठा फायदा

7वा वेतन आयोग : शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 'हा' मोठा फायदा

HRA, 7th pay commission - केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास भेट दिलीय

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग सुरू करून बराच काळ लोटला. आता त्यांना देण्यात येणाऱ्या घर भाडे भत्त्याबद्दलचा संभ्रम संपलाय. कर्मचाऱ्यांचा HRA वाढलाय. शहरातली लोकसंख्या लक्षात घेता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यात वाढ करण्यात आलीय.

7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारनं  HRA मध्ये सुधारणा केल्या होत्या. यात तीन कॅटेगरी बनवल्या गेल्या. या कॅटेगरी शहराच्या लोकसंख्येप्रमाणे तयार केल्या. ज्या विभागात 50 लाखापेक्षा लोकसंख्या आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात 24 टक्के HRA मिळतो. दुसऱ्या विभागातल्या शहरातल्या कर्मचाऱ्यांना 16 टक्के HRA मिळतो. तर तिसऱ्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना 8 टक्के HRA मिळतो.

LIC ची खास पाॅलिसी, 15 रुपये खर्च करून होईल लाखो रुपयांचा फायदा

रेल्वेची नवी योजना, तिकीट बुक करताना मिळेल 'हा' नवा पर्याय

XYZ अशा कॅटेगरी आहेत. 2011 साली हे विभाग ठरवण्यात आलेत. 2011मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे या कॅटेगरी ठेवल्यात. समजा एखाद्या शहराची लोकसंख्या वाढली तर त्या शहराची कॅटेगरी बदलते आणि मग तिथल्या कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यातही बदल होतो. समजा एखाद्या शहराची लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त झाली तर ते शहर Z कॅटेगरीतून Y मध्ये येतं. मग कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता 8 टक्क्यावरून 16 टक्क्यांवर येतो.

Loading...

काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन

डिसेंबर महिन्यात राज्य सरकारनेही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयाला मंजुरी दिली होती. साधारणपणे 23% वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. 17 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 7 लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांना याचा लाभ आता होतोय. या सगळ्यामुळे सरकारी तिजोरीवर  दरवर्षी  24 हजार 485 कोटींचा बोजा पडतोय.

शेतकऱ्याची गाण्यातून व्यथा मांडणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...