• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Upcoming IPO : सेबीकडून 7 कंपन्यांना IPO आणण्याची परवानगी, गुंतवणुकीची मोठी संधी

Upcoming IPO : सेबीकडून 7 कंपन्यांना IPO आणण्याची परवानगी, गुंतवणुकीची मोठी संधी

सात कंपन्यांना सेबीकडून (Securities Exchange Board of India) IPO आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : IPO आणण्यासाठी 7 कंपन्यांना सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी (Securities Exchange Board of India) कडून मान्यता मिळाली आहे. या कंपन्यांमध्ये पीबी फिनटेक लि. (PB Fintech Limited), ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक (ESAF Small Finance Bank), सॅफायर फुड्स इंडिया (Sapphire Foods India), आनंत राठी वेल्थ (Anand Rathi Wealth), वन 97 कम्युनिकेशन लि. (One97Communications Limited), एचपी अॅडहेसिव्स (HP Adhesives) आणि टार्सन प्रोडक्ट्स लि (Tarson Products Limited) यांचा समावेश आहे. One97 Communications IPO ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. पेटीएमच्या आयपीओ अंतर्गत, 8,300 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर 8,300 कोटी रुपये किंवा ऑफर फॉर सेल (OFS) आणले जातील. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाकडे होता, ज्याने जवळपास दशकभरात 15000 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. PB Fintech Limited हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म पॉलिसीबाजार आणि पैसाबाजार यांच्या मालकीचा आहे. पॉलिसी बाझारच्या IPO अंतर्गत, 3750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर 2267.50 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) आणली जाईल. पॉलिसी बाझार हे विमा आणि कर्ज उत्पादनांसाठी देशातील सर्वात मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ESAF Small Finance Bank ESAF Small Finance बँकेच्या आयपीओमध्ये 800 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि विद्यमान प्रमोटर आणि शेअरहोल्डर्सकडून 197.78 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) आहे. Rakesh Jhunjhunwala यांची 'या' रियल्टी स्टॉकमध्ये गुंतवणूक, वर्षभरात 225 टक्क्यांचे रिटर्न्स Sapphire Foods IPO Sapphire Foods चा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल. या अंतर्गत विद्यमान शेअरहोल्डर आणि प्रमोटर्स त्यांचे 1.757 कोटी शेअर्स विकतील. कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्ट, सेफायर फूड्स मॉरिशस लिमिटेड, डब्ल्यूडब्ल्यूडी रुबी लिमिटेड, एडलवाईस क्रॉसओव्हर ऑपर्च्युनिटीज फंड सीरिज II इत्यादींचा समावेश आहे. Anand Rathi Wealth Anand Rathi Wealth चा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल. या अंतर्गत, विद्यमान शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्स त्यांचे अंदाजे 92.9 लाख शेअर्स विकतील. आनंद राठी वेल्थची गणना भारतातील टॉप नॉन-बँक वेल्थ सोल्युशन्स फर्ममध्ये केली जाते. आर्थिक वर्ष 2020 मध्ये नोंदवलेल्या एकूण कमिशननुसार हे देशातील पहिल्या तीन नॉन-बँक म्युच्युअल फंड वितरकांमध्ये आहे. 'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी HP Adhesives HP Adhesives च्या IPO अंतर्गत, 41.40 नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील, तर प्रमोटर अंजना हरीश मोटवानी त्यांचे 4,57,200 शेअर्स विकतील. एचपी अॅडेसिव्ह पीव्हीसी, सॉल्व्हेंट सिमेंट, सिंथेटिक रबर अॅडेसिव्ह, पीव्हीए अॅडेसिव्ह, सिलिकॉन सीलेंट, अॅक्रेलिक सीलंट, गॅस्केट शेलॅक, इतर सीलंट आणि पीव्हीसी पाईप ल्युब्रिकंट यासारख्या कंज्युमर अॅडेसिव्ह आणि सीलेंट उत्पादने तयार करतात. Tarson Products Limited Tarson Products Limited च्या IPO अंतर्गत, 150 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि 1.32 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत ऑफर केले जातील. कंपनी लॅबवेअर उत्पादने तयार करते ज्याचा उपयोग वैज्ञानिक शोध आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केला जातो. मार्च 2021 पर्यंत कंपनीकडे सुमारे 300 उत्पादनांचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ होता.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: