मराठी बातम्या /बातम्या /मनी /नवीन आर्थिक वर्षात वाहन खरेदी करण्याचा विचार आहे? एप्रिल महिन्यात लॉन्च होताय या खास कार

नवीन आर्थिक वर्षात वाहन खरेदी करण्याचा विचार आहे? एप्रिल महिन्यात लॉन्च होताय या खास कार

एप्रिल महिन्यात लॉन्च होताय या नव्या कार

एप्रिल महिन्यात लॉन्च होताय या नव्या कार

एप्रिलमध्ये भारतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार लाँच होणार आहेत. या गाड्यांच्या किंमती लाखांपासून ते कोटी रुपयांच्या घरात आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    आर्थिक वर्ष 2023-24 एप्रिल महिन्यापासून सुरू होत आहे. तुम्हाला जर येणाऱ्या आर्थिक वर्षात कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एप्रिलमध्ये भारतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार लाँच होणार आहेत. या गाड्यांच्या किंमती लाखांपासून ते कोटी रुपयांच्या घरात आहेत. आज आम्ही तुम्हाला एप्रिल महिन्यात लाँच होणाऱ्या अशाच काही कार्सबाबत माहिती देणार आहोत. कार खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार या पैकी एखादी कार नक्कीच खरेदी करू शकता. चला तर, एप्रिल महिन्यात लाँच होणाऱ्या कार नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलंय.

    मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

    एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मारुती सुझुकी फ्रॉन्क्स भारतात लाँच होईल. पाच व्हेरियंटमध्ये आणि नऊ रंगांच्या ऑप्शनमध्ये असणाऱ्या या कार मध्ये 9.0 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, हिल-होल्ड असिस्ट, ईएसपी प्रोग्रॅम, वायरलेस चार्जिंग यासह विविध फीचर्स आहेत. या कारची भारतात एक्स शोरुम किंमत 7 लाख ते 11 लाख रुपयांदरम्यान असू शकते. अर्थात व्हेरियंटनुसार ही किंमत बदलू शकते. 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.2 लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन या दोन इंजिन ऑप्शनमध्ये ही कार आहे. तुमचं जर कार खरेदी करण्याचं बजेट कमी असेल, तर तुमच्याासाठी ही कार चांगला ऑप्शन आहे.

    कमी पैशात कार इन्शुरन्स हवंय ना? मग माहिती असायलाच हव्यात या 5 ट्रिक्स

    लॅम्बॉर्गिनी उरुस एस

    लॅम्बॉर्गिनी कंपनी 13 एप्रिल, 2023 रोजी भारतात ‘लॅम्बॉर्गिनी उरुस एस’ही गाडी लाँच करण्यासाठी सज्ज आहे. प्रीमियम एसयूव्हीची किंमत लॅम्बॉर्गिनी उरुस परफॉर्मेन्ट पेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. या गाडीमध्ये 666hp, 4.0 लिटर, व्ही 8 ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 8 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स सह जोडलेलं आहे. त्यामुळे गाडी 3.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगानं धावू शकते. या गाडीची एक्स शोरुम किंमत भारतीय बाजारपेठेत सुमारे 4 कोटी रुपये असू शकते. लक्झरी कार खरेदी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे.

    मर्सिडीज एएमजी जीटी 63 ई परफॉर्मन्स

    मर्सिडीज कंपनीची मर्सिडीज एएमजी जीटी 63 ई परफॉर्मन्स ही गाडी भारतात 11 एप्रिल 2023 रोजी लाँच होईल. लक्झरी कार तयार करणाऱ्या मर्सिडीज कंपनीचा दावा आहे की, मर्सिडीज एएमजी जीटी 63 ई परफॉर्मन्स हे मॉडेल त्यांचे आतापर्यंतचं सर्वांत शक्तिशाली मॉडेल असणार आहे. या गाडीच्या फीचर्समध्ये एएमजी परफॉर्मन्स एक्झॉस्ट सिस्टम, एएमजी राइड कंट्रोल सस्पेंशन, थ्री डी सराउंड साउंड आदींचा समावेश आहे. या गाडीची भारतातील एक्स शोरुम किंमत अंदाजे 2.50 कोटी ते 2.80 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. या हायब्रिड सेडान गाडीला पॉवरिंग 639 hp सह 4.0 लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड व्ही 8 इंजिन आणि 204 hp सह इलेक्ट्रिक मोटर असेल. ती 2.9 सेकंदांत 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या गाडीचा वेग 316 किलोमीटर प्रतितास पर्यंत वाढू शकतो. वेगवान गाडी खरेदी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही गाडी चांगला ऑप्शन आहे.

    टोयोटा इनोव्हा क्रिस्टा नवीन व्हेरियंट

    टोयोटानं अलीकडेच भारतीय बाजारात इनोव्हा क्रिस्टा फेसलिफ्ट ही गाडी लाँच केली होती. कंपनी आता पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत एमपीव्ही हे दर्जेदार फीचर्स असणारी 2.4 ZX 7 सीटर लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. इनोव्हा क्रिस्टाची काही प्रमुख फीचर्स म्हणजे एलईडी हेडलॅम्प, 7.0 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि 16 इंच अलॉय व्हील आदी आहेत. क्रिस्टा नवीन व्हेरियंटला 2.4 लिटर डिझेल इंजिन आहे, जे 148 bhp पॉवर आणि 360 Nm टॉर्क देते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सह जोडलेले असेल. इनोव्हा क्रिस्टा फेसलिफ्टच्या नवीन व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत भारतात सुमारे 23 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. तुमचे जर कार खरेदी करण्याचं 20 ते 25 लाखांपर्यंत बजेट असेल, तर तुमच्यासाठी हा गाडी बेस्ट पर्याय ठरू शकते.

    Railway Knowledge: कुठे असतं रेल्वेचं पेट्रोल पंप? कसं भरलं जातं डिझेल? घ्या जाणून

    एमजी कॉमेट ईव्ही

    एप्रिल 2023 मध्ये ही गाडी लाँच होण्याची शक्यता आहे. एमजी कॉमेट ईव्ही मध्ये एलईडी स्ट्रिप आणि 2 मीटरपेक्षा जास्त व्हीलबेसद्वारे कनेक्ट केलेले एलईडी हेडलॅम्प आहेत. या गाडीत 10.25 इंच ड्युअल स्क्रीन असून ज्यामध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे. 20 kWh आणि 25 kWh अशा दोन बॅटरी ऑप्शनमध्ये ही गाडी लाँच होण्याची शक्यता आहे. या गाडीची रेंज 200 किलोमीटर असेल, असा दावा करण्यात आला होता. परंतु आता नव्या दाव्यानुसार या गाडीची रेंज 350 किलोमीटरपर्यंत असेल. या गाडीची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी ही गाडी उत्तम ऑप्शन आहे.

    First published:
    top videos

      Tags: Car