Home /News /money /

Unlock 1.0 च्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, असे आहेत मुंबईतील दर

Unlock 1.0 च्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, असे आहेत मुंबईतील दर

अनलॉक-1 च्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

    मुंबई, 08 जून : कोरोनाच्या संकटात (Coronavirus) आजपासून लॉकडाऊन (Lockdown) हटवण्याच्या पहिल्या टप्प्याला म्हणजे अनलॉक-1ला (Unlock-1) सुरुवात झाली. दरम्यान अनलॉक-1 च्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 78.91 रुपये आहे. रविवारी तो 78.32 रुपये होता. आज 59 पैशांनी पेट्रोलच्या किंमतीत ची वाढ झाली आहे. यासह ऑई मार्केटिंग कंपन्यांनी तेलाच्या किंमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दिल्लीत आज पेट्रोलचा दर 71.86 रुपये प्रती लीटर झाला आहे. कोलकात्यात 73.89 रुपये लीटर आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ग्राहकांना 76.15 मोजावे लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या विमानांच्या इंधन आणि देशांतर्गत एलपीजी (LPG) च्या दरांमध्ये नियमित अंतरावर बदल करत आहेत. पण 16 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. क्रूड तेलाच्या किंमतींबाबत (Crude oil price) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रचंड गडबड हे त्याचे कारण होते. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) प्रतिलिटर तीन रुपये वाढ केल्यावर किंमती स्थिरावल्या. 6 मे रोजी सरकारने पेट्रोलवर उत्पादन शुल्कात दहा रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 13 रुपये वाढवूनही त्यांचे दर स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कंपन्यांनी केलेल्या नफ्यात कच्च्या तेलाचे दर खाली नोंदविल्या गेल्यामुळे त्यांनी सरकारने वाढवलेल्या उत्पादन शुल्कात वाढ केली. वाचा-अलर्ट! 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान असे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घ्या देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. वाचा-सोनं खरेदी करण्यासाठी जातायं? हे महत्त्वाचे नियम पाळायला विसरू नका
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या