'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

United Bank of India , EMI - सरकारी बँकेनं ग्राहकांना खूश केलंय. जाणून घ्या त्याबद्दल -

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : देशातली मोठी सरकारी बँक युनायटेड बँक ऑफ इंडियानंही (UBI ) आपल्या ग्राहकांना कर्जाचे दर कमी केलेत. म्हणजे आता ग्राहकांना कमी ईएमआय द्यावा लागेल. बँकेनं एमसीएलआर कमी केलेत. त्यानंतर तुम्हाला होम, ऑटो आणि पर्सनल लोन घ्यायचं अलसेल तर नक्कीच फायदेशीर होईल. ज्या ग्राहकांनी एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतलं असेल त्यांना ईएमआय कमी पडेल.

एप्रिल 2016च्या आधी रिझर्व्ह बँकेद्वारे कर्ज देताना मिनिमम रेट बेस रेट होता. बँका कमी दरात आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकतं नव्हत्या. 1 एप्रिल 2016 पासून बँकिंग सिस्टिममध्ये MCLR लागू केलं आणि हा कर्जासाठी मिनिमम दर बनला. म्हणजे त्यानंतर MCLR च्या आधारेही कर्ज दिलं जायला लागलं.

नोकरी मिळणं होईल सोपं, सरकार देणार नव्या जमान्याचं ट्रेनिंग

किती कमी होणार तुमचं EMI?

युनायटेड बँक ऑफ इंडियानं RBIद्वारा रेपो रेटमध्ये कपात केलीय. दुसऱ्या वेळी कर्जाचे दर कमी केलेत. नवे दर आजपासून ( 17 जुलै ) लागू होतील.

युनायटेड बँक ऑफ इंडियाचे MCLR दर 8.75 टक्के कमी होऊन 8.70 टक्के झालेत. एक आणि तीन महिन्यांचे दर 8.23 टक्के आणि 8.40 टक्के झालेत.

MIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

जूनमध्ये दर कमी झाल्यावर युनायटेड बँकेनं 17 जूनलाही 0.05 टक्के दर कमी केले होते. देशातल्या अनेक बँकांनी आपले व्याज दर कमी करून कर्मचाऱ्यांना स्वस्त EMIची भेट दिलीय.

पंजाब नॅशनल बँकेनंही RBIद्वारा रेपो रेट कमी केल्यानं पहिल्यांदा आपले व्याज दर कमी केले. वेगवेगळ्या कार्यकाळात  MCLRमध्ये 0.05 कपात केलीय, तर 1 वर्षासाठी MCLR 8.40 टक्के झालंय.

भारताचा प्रशिक्षक कसा हवा? BCCI ने घातल्या 'या' अटी

बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट ठेवली तर नुकसान होऊ शकतं. सेव्हिंग अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याचे बँकेचे नियम असतात. असं नाही केलं तर बँक दंड वसूल करते. अनेक बँकांमध्ये कमीत कमी बॅलन्स 10 हजार रुपये असतो. अशा वेळी तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त अकाउंट असेल तर तुमची चिंता वाढू शकते. कारण सर्वसामान्यांना सेव्हिंग अकाउंटमध्ये 20 हजार रुपये जमा करणं कठीण होऊन जातं.

कोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड

Tags:
First Published: Jul 17, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading