पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा! लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुदत वाढवली

पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा! लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुदत वाढवली

पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही निवृत्त झाले आहात आणि तुम्हाला पेन्शन मिळते आहे, तर लवकरात लवकर तुमची पेन्शन येणाऱ्या बँकेमध्ये लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate)जमा करा. दरवर्षी पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. मात्र सरकारने आता ही तारीख वाढवून 31 डिसेंबर केली आहे. पेन्शनधारक हयात असल्याचा पुरावा म्हणून लाइफ सर्टिफिकेट द्यावे लागते, असे न केल्यास पेन्शन मिळणे बंद होते.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. कोरोना व्हायरस पँडेमिक काळात सरकारने सूट देत हा कालावधी वाढवला आहे.

(हे वाचा-दर महिन्याला 1000 रुपयांच्या बचतीतून कमवा लाखो रुपये, वाचा कुठे कराल गुंतवणूक)

केंद्र सरकारने सर्व पेन्शनधारकांना असे सूचित केले आहे की, ते 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या दोन महिन्याच्या काळात कधीही लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतात. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत शुक्रवारी माहिती दिली.

लाइफ सर्टिफिकेट म्हणजे काय?

लाइफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधार हयात असण्याचा पुरावा असतो. हे जमा न केल्यास तुमचे पेन्शन मिळणे बंद होऊ शकते.

लाइफ सर्टिफिकेट कुठे जमा करावे लागते?

लाइफ सर्टिफिकेट ज्या बँकेमध्ये तुमचे पेन्शन खाते आहे, त्या शाखेमध्ये किंवा या बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन जमा करू शकता. त्याचप्रमाणे डिजिटली देखील तुम्ही ते जमा करू शकता. https://jeevanpramaan.gov.in यावर जाऊन, जवळचे आधार आऊटलेट/CSC वर जांऊन तसंच उमंग App च्या माध्यमातून देखील सर्टिफिकेट जमा करू शकता.

(हे वाचा-भारताचा GDP 11.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता, Moody's ने देखील व्यक्त केली चिंता)

डिजिटली हे सर्टिफिकेट जमा करण्यासाठी आधार नंबर, मोबाइल नंबर, पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर व खाते नंबरची आवश्यकता असते. लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठीचा फॉर्म बँकांच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येतो.

लाइफ सर्टिफिकेट जमा न केल्यास काय होईल?

हे सर्टिफिकेट जमा न केल्यास संबंधित व्यक्तीस पेन्शन मिळणे बंद होईल आतापर्यत पेन्शनधारकांना पेन्शन जारी ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागत असे, यावर्षी ही तारीख 31 डिसेंबर करण्यात आली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 12, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या