मराठी बातम्या /बातम्या /मनी /Union Budget 2023 : अर्ध्या लोकसंख्येला आहेत बजेटकडून मोठ्या अपेक्षा, पाहा Video

Union Budget 2023 : अर्ध्या लोकसंख्येला आहेत बजेटकडून मोठ्या अपेक्षा, पाहा Video

X
Union

Union Budget 2023 : देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणाऱ्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Union Budget 2023 : देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणाऱ्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

    पुणे, 30 जानेवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षीमकरणासाठी काय योजना जाहीर होणार याची सर्वांना उत्सुकता असते. निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थमंत्री झाल्यापासून तर या गोष्टीला आणखी विशेष महत्त्व आलंय. या बजेटमध्ये महिलांच्या कल्याणासाठी कोणत्या गोष्टी अर्थमंत्र्यांनी कराव्यात, याबाबत पुण्यातील आयसीएआयच्या उपाध्यक्ष ऋता चितळे यांनी माहिती दिली आहे.

    महिलांना बजेटपासून काय हवं?

    एक महिला शिकली आणि स्वत:च्या पायावर उभी राहिली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. त्यामुळे बजेटमध्ये महिलांचे आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. महिला बचत गट तसंच एकल महिला स्टार्टअप उद्योजिकींना चांगल्या व्याजदरानं कर्जाची मंजुरी द्यावी.

    कोरोनाचा फटका बसलेला स्टार्टअप उद्योग कशी भरारी घेणार? Video

    कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील महिलांना सॅनिटरी पॅड आणि अंतर्वस्त्रे ही रेशनच्या दुकाना स्वस्त किंवा मोफत उपलब्ध व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर महिलांना आरोग्यासाठी लागणाऱ्या B12 व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि इतर औषधं ही आरोग्य खात्याकडून मोफत देण्यात यावी. तसं झालं तर महिलांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या आरोग्याचा खर्च कुटुंबावर पडणार नाही,' असे चितळे यांनी स्पष्ट केले.

    महिलांना मेडिकल इन्शुरन्समध्ये सवलत मिळावी, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्यासाठी किंवा औषधोपचारासाठी घरच्यांवर जास्त अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होईल. सदृढ आणि सक्षम स्त्री हीच भारताची खरी ओळख आहे, असं मत चितळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

    First published:

    Tags: Budget 2023, Local18, Nirmala Sitharaman, Pune