नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. पण, यावेळी सभागृहामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, भाजप खासदारांनी मोदी मोदी अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं. तर रामदास आठवले यांनीही सुनो काँग्रेसवालो असा टोमणा मारला.
निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या योजना आणि तरतुदींबद्दल घोषणा करत होत्या. अर्थसंकल्प 7 मुद्यांवर आधारीत आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच भाजप खासदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. यावेळी, भाजप खासदारांनी मोदी मोदी अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं.
तर, निर्मला सीतारमन अर्थसंकल्पीय भाषण वाचताना मध्येच थांबल्या असता त्यांच्या मागे बसलेल्या रामदास आठवलेंनी मध्येच 'सुनो काँग्रेसवालो' असं म्हणताच सभागृहात एकच हास्याची लकेर उमटली. दोन मिनिट अर्थमंत्री सीतारमन सुद्धा थांबल्या होत्याा.
(Budget 2023 LIVE UPDATES : निर्मला सीतारामन बजेट सादर करत असताना 'मोदी मोदी' नारेबाजी)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सात प्राधान्यक्रम सांगितले. अर्थसंकल्पात 7 प्राधान्यक्रमांचा अवलंब करण्यात आला आहे जे आपल्याला अमृत कालचे मार्गदर्शन करतील
1. सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या मैलापर्यंत पोहोचणे
3. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
4. क्षमता मुक्त करणे
5. हिरवी वाढ
6. युवा शक्ती
7. वित्त क्षेत्र
सर्वांच्या सहभागासह विकास (ज्यामध्ये वंचितांसह सर्वांना प्राधान्य दिले जाईल), शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष दिले जाईल.
(हे ही वाचा : Union Budget 2023 : बजेटआधी शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड, पाहा नेमकं काय घडतंय)
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून 1.97 लाख रुपये झाले आहे. या 9 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.