मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर करणार आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला आज एक खास गोष्ट सांगणार आहोत. आजच्या घडीला विवाहित असो किंवा अविवाहित दोघांनाही एकसारखाच टॅक्स भरावा लागतो. पण एक वेळ अशी होती की या दोघांसाठी वेगवेगळे कर भरायची सुविधा होती.
यावेळी करदात्यांना 8 वर्षांनंतर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पाच्या हंगामात अशा काही टॅक्सबद्दल सांगत आहोत ज्याची आज कल्पनाही करता येणार नाही. एक काळ असा होता जेव्हा विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी वेगळा आयकर स्लॅब होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1955-56 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी स्वतंत्र आयकर स्लॅब होते. तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. कौटुंबिक भत्त्याची योजना सुरू करण्यासाठी हा स्लॅब तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
1955-56 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देशमुख यांनी विवाहितांसाठी सध्याचा 1500 रुपयांचा करसवलत स्लॅब वाढवून 20 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी अविवाहितांसाठी ती कमी करून एक हजार रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती.
Union Budget 2023 : अर्ध्या लोकसंख्येला आहेत बजेटकडून मोठ्या अपेक्षा, पाहा Video
1955-56 साली विवाहितांसाठी टॅक्स?
0 ते 2000 रुपये - कोणताही कर नाही
2,001 ते 5,000 रुपये - 9 पैसे
5,001 ते 7,500 रुपये - एक आणा आणि नऊ पै
7,501 ते 10,000 रुपये - दोन आणे आणि तीन पै
10,001 ते 15,000 रुपये - तीन आणे आणि 3 पै
Budget 2023 : संपूर्ण बजेट तुम्हाला LIVE कधी आणि कुठे पाहता येणार?
1955-56 साली अविवाहितांसाठी कसा होता टॅक्स स्लॅब?
0 ते 1,000 रुपये - कोणताही कर नाही
1,001 रुपये ते 5,000 रुपये - नऊ पै
5,001 रुपये ते 7,500 रुपये - एक आणा आणि नऊ पै
7,501 रुपये ते 10,000 रुपये - दोन आणे आणि तीन पै
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, Marriage, Money, Nirmala Sitharaman, Union Budget 2023