Home /News /money /

Budget 2022: असं असेल सर्वसाधारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ आणि इतर माहिती

Budget 2022: असं असेल सर्वसाधारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ आणि इतर माहिती

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2022) 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल.

    नवी दिल्ली, 15 जानेवारी: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2022) 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,  सूत्रांनी शुक्रवारी संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या शिफारशीचा हवाला देत ही माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Union Budget 2022) देशासमोर सादर केला जाईल. या अर्थसंकल्पातून देशातील विविध वर्गातील नागरिकांच्या विविध अपेक्षा आहेत. दरम्यान या बजेट सेशनचा पहिला भाग 11 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर सत्राचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होऊन 8 एप्रिलला संपणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यम वर्गाला मोठ्या अपेक्षा भारतातील ओमिक्रॉनचे संक्रमण अचानक वाढत असताना, सर्वांचे लक्ष यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. आयकर अंतर्गत मानक कपातीची मर्यादा वाढवण्यासाठी कोविड-19 काळात दिलासा मिळण्यापासून ते केंद्रीय अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यापर्यंत, मध्यम वर्गाला अर्थमंत्र्यांकडून विशेष अपेक्षा आहेत. हे वाचा-मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, संसदीय कामकाज मंत्रालयाचे अतिरिक्त महासचिव यांच्या एका पत्रात असे म्हटले आहे की, 'राज्यसभेचे 256 वे अधिवेशन (अर्थसंकल्पीय अधिवेशन – 2022) सोमवार, 31 जानेवारी रोजी बोलावण्यात आले आहे आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यकतेच्या अधीन, हे अधिवेशन शुक्रवार, 8 एप्रिल रोजी संपू शकते. या कालावधीत सभापतींना राज्यसभा शुक्रवार, 11 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याची विनंती केली जाऊ शकते जेणेकरून त्यांना सोमवारी 14 मार्च रोजी पुन्हा बैठक करता येईल, जेणेकरून विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्या मंत्रालये/विभागांशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवर विचार करू शकतील आणि त्यांचे अहवाल तयार करू शकतील.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Budget, Union budget

    पुढील बातम्या