Home /News /money /

Budget 2022 : अर्थसंकल्पात काळानुरुप झालेले बदल आणि महत्त्वाच्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहेत का?

Budget 2022 : अर्थसंकल्पात काळानुरुप झालेले बदल आणि महत्त्वाच्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहेत का?

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून ते 8 एप्रिल 2022 रोजी संपणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की, यंदाचा अर्थसंकल्प साथीच्या तिसऱ्या लाटेपासून (Corona Third Wave) सर्वसामान्यांना वाचवणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरणार आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 जानेवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून ते 8 एप्रिल 2022 रोजी संपणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की, यंदाचा अर्थसंकल्प साथीच्या तिसऱ्या लाटेपासून (Corona Third Wave) सर्वसामान्यांना वाचवणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पानंतर 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे अर्थसंकल्प बऱ्यापैकी पॉप्युलिस्ट असणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, हे बजेट सादर झाल्यावरच कळेल. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याचा संबंध भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासाशी आहे. पहिला अर्थसंकल्प कधी आणि कुठे सादर झाला हे अनेकांना माहीत नाही. Budget 2022: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय? बजेटआधी सादर केला जातो Economic Survey पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला? अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या उत्पन्नाचा आणि वर्षभराच्या खर्चाचा सरकारी लेखाजोखा. त्याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली. ब्रिटीशांच्या काळात भारतात पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारताचे अर्थसंकल्प सादर करणारे सर्वोच्च पदावरील पहिले व्यक्ती होते. केसी नियोगी हे भारताचे एकमेव अर्थमंत्री ठरले ज्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही. 1948 मध्ये ते 35 दिवस अर्थमंत्री होते आणि त्यांच्यानंतर जॉन मथाई हे भारताचे तिसरे अर्थमंत्री झाले. अर्थसंकल्प 11 वाजताच का सादर होतो? आता अर्थसंकल्प दुपारी 11 वाजता सादर केला जातो. यापूर्वी ब्रिटीशांच्या काळात संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता. अर्थसंकल्पावर रात्रभर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून असं केलं जात असे. 1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत प्रकाशित होत असे, परंतु 1955-56 पासून सरकारने ते हिंदीतही प्रकाशित करण्यास सुरुवात केली. कोणत्या अर्थमंत्र्यांनी अधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी दहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात आठ अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प आहेत. यानंतर यूपीएमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी 9 वेळा आणि प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला. यशवंत सिन्हा यांनी 8 वेळा तर मनमोहन सिंग यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला अर्थमंत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. पंतप्रधान असताना त्यांनी अर्थखातेही सांभाळले. 5 जुलै 2019 रोजी निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. म्हणजे निर्मला सीतारामन यांच्या आधी केवळ अर्थमंत्री राहिलेली अशी एकही महिला नव्हती. PM Kisan: ही सेवा झाली बंद, कोट्यवधी लाभार्थ्यांवर होणार परिणाम;अशाप्रकारे तपासा चामड्याची लाल बॅग आधी ब्रिटनचे अर्थमंत्री संसदेत सरकारच्या खर्चाची आणि उत्पन्नाची माहिती देत ​​असत आणि ती लाल चामड्याच्या बॅग आणली जायची, पण भाजप सरकारने लाल बॅगची परंपरा संपवली. निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये बजेट दस्तऐवज ब्रीफकेसऐवजी पारंपारिक लाल कापडात गुंडाळलेला कागदात नेण्याची प्रथा सुरू केली. पेपरलेस बजेट भारतीय इतिहासात पहिल्यांदाच 2021 मध्ये अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस झाला. अर्थसंकल्पाची छपाई केली गेली नाही. सर्व खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांना ते अधिकृत वेबसाइटवरून मिळते. 2021 मध्ये जाहीर झालेले आर्थिक सर्वेक्षण देखील पूर्णपणे पेपरलेस होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Nirmala Sitharaman

    पुढील बातम्या