• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Union Budget 2019 : अर्थसंकल्पाबद्दल माहिती असायलाच हव्यात अशा 10 गोष्टी

Union Budget 2019 : अर्थसंकल्पाबद्दल माहिती असायलाच हव्यात अशा 10 गोष्टी

मोदी सरकार येत्या 5 जुलैला पूर्ण बजेट सादर करतेय. 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर झालं होतं. निवडणुकीनंतर आता पूर्ण बजेट सादर होईल.

 • Share this:
  मुंबई, 06 जून : मोदी सरकार येत्या 5 जुलैला पूर्ण बजेट सादर करतेय. 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर झालं होतं. निवडणुकीनंतर आता पूर्ण बजेट सादर होईल. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये घोषित होणाऱ्या union-budget-2019 मध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल होणार नाही. यामुळे रिव्हेन्यू कलेक्शन कमी झालंय. बजेटनंतर थेट करावर टास्क फोर्सचा रिपोर्ट येईल. पण सध्या तरी डायरेक्ट टॅक्समध्ये काही बदल केला जाणार नाही. union-budget-2019 बद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. याची सुरुवात कशी झाली, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी झाला अशा काही रंजक गोष्टी जाणून घेऊ. ATM मधून पैसे काढण्यासाठी कुठलीही बँक लावू शकणार नाहीत हे चार्जेस अर्थसंकल्पाची सुरुवात - जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रुवारी 1860 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळेच त्यांना भारताच्या अर्थसंकल्पाचे जनक असंही म्हटलं जातं. तर 1867 पासून 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष म्हणून मोजायला सुरुवात झाली. भारताचा पहिला अर्थसंकल्प - स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के. ष्णमुगम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. तर भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर जॉन मथाई यांनी 28 फेब्रुवारी 1950 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. चेट्टी यांनीच छोट्या कालावधीतल्या अर्थसंकल्पासाठी पहिल्यांदा 'हंगामी'अर्थसंकल्प या शब्दाचा प्रयोग केला. RBI ची मोठी घोषणा, ग्राहकांना आता द्यावे नाही लागणार बँकेचे 'हे' दर अर्थसंकल्पाची छपाई - सुरुवातीच्या काळात राष्ट्रपती भवनात अर्थसंकल्पाची छपाई होत असे. 1950मध्ये अर्थसंकल्प फुटला त्यानंतर दिल्लीतल्या सेक्युरेटी प्रेसमध्ये त्याची छपाई होऊ लागली. नंतर 1980 पासून नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्प तयार होऊ लागला. 1955-56 पासून इंग्रजीसोबतच हिंदीमध्येही अर्थसंकल्प तयार करण्यात येऊ लागला. अत्यंत गोपनीय - अर्थसंकल्पावरच देशाचा गाडा अवलंबून असल्याने त्यातल्या तरतूदींबाबत कमालीची गोपनीयता पाळली जाते. अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना त्या कामात जेवढे कर्मचारी असतात त्या सगळ्यांना त्या काळात अर्थमंत्रालयातच थांबवून घेतलं जातं. त्यांना कुणालाही भेटण्याची, बोलण्याची परानगी दिली जात नाही. पंतप्रधानच अर्थमंत्री - पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1958-59 मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांच्याकडेच अर्थमंत्रालयही होतं. त्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. 10वीच्या निकालाआधी राहा टेन्शन फ्री, त्यासाठी 'या' गोष्टी कराच महिला अर्थमंत्री - आता निर्मला सीताराम अर्थमंत्री आहेत. union-budget-2019 त्या सादर करतील. पण इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर असताना इंदिरा गांधी यांच्याकडेच अर्थमंत्रालयाचाही कार्यभार होता. आत्तापर्यंत त्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठरल्या आहेत. बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं. असे अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले. अर्थसंकल्पाचा विक्रम - मोरारजी देसाई यांनी आत्तापर्यंत सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. 6 वेळा अर्थमंत्री असताना आणि 4 वेळा उपपंतप्रधान असताना त्यांना ती संधी मिळाली होती. तर प्रणव मुखर्जी यांना 7 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. अर्थसंकल्पाची वेळ - 2000पर्यंत अर्थसंकल्प हा संध्याकाळी पाच वाजता सादर होत असते. ब्रिटिशांच्या काळापासून ती प्रथा सुरू होती. तिथल्या संसदेच्या वेळेनुसार त्याचं नियोजन होतं. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी ही वेळ बदलली आणि अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर व्हायला लागला. यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. तारीखही बदली - 2017 च्या आधी अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. पण सरकारी खर्चाच्या दृष्टीने तो 2017 पासून 1 फेब्रुवारीला सादर करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचबरोबर रेल्वेच्या अर्थसंकल्पाचाही मुख्य अर्थसंकल्पात समावेश केला गेला. VIDEO : युतीत धुसफूस सुरूच, उद्धव ठाकरेंनी केली नवी मागणी!
  First published: