Elec-widget

उद्या PM मोदींची अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक, जनतेला मिळू शकतो 'असा' दिलासा

उद्या PM मोदींची अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक, जनतेला मिळू शकतो 'असा' दिलासा

सूत्रांच्या माहितीनुसार उद्याच्या बैठकीत 5 मुद्यांवर चर्चा होऊ शकते

  • Share this:

मुंबई, 21 जून : येत्या 5 जुलैला मोदी सरकारचं पूर्ण बजेट सादर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी उद्या ( 22 जून) अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थव्यवस्था, शेती आणि निर्यात यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार आहे. सोबत आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना बनवली जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार उद्याच्या बैठकीत 5 मुद्यांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीत अर्थव्यवस्था वेगवान करण्यावर विचार होऊ शकतो. शेतीचा विकास दर वाढवण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा होईल. निर्यात कसा वाढवायचा, हेही ठरवलं जाईल.

घरी बसून एका काॅलवर ट्रेन तिकीट होईल रद्द, जाणून घ्या प्रोसेस

त्याचबरोबर चांगली आरोग्य व्यवस्था हा मुद्दा फोकसमध्ये राहील. शिक्षण व्यवस्था आणि नवी शिक्षण नीती यावरव चर्चा होईल. या सगळ्या गोष्टींवर अर्थतज्ज्ञांनी सुचवलेल्या गोष्टींचा समावेश बजेटमध्ये केला जाईल.

RRB recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी, 992 पदांवर भरती

Loading...

न्यूज एजन्सी ब्लूमबर्ग अनुसार यावेळी नोकरदारांसाठी इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत मिळू शकते. इन्कम टॅक्स सूट 2.5 लाखावरून 3 लाख रुपये होऊ शकते. एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. फेब्रुवारीत जे अंतरिम बजेट सादर झालं त्यात 5 लाख रुपये मिळकत करमुक्त ठरवली होती.

आता दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं होईल सोपं, मोदी सरकार उचलणार ही पावलं

नोकरदारांसाठी मोठा दिलासा

अंतरिम बजेटमध्ये 5 लाखापर्यंत इन्कमवर पूर्ण रिबेट देऊन सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा दिला होता. ब्लूमबर्ग अनुसार सरकार हा फायदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून सर्व करदात्यांना देऊ शकतं. अशी आशा आहे की सरकार 3 लाख रुपयापर्यंत टॅक्सेबल इन्कमची मर्यादा वाढू शकते. 10 लाखावर 30 टक्के टॅक्स स्लॅब 2012च्या बजेटपासून बदललं नाही.

VIDEO : विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...