मोठी खुशखबर : मोदी सरकार करदात्यांना देणार का हा सुखद धक्का?

यंदाच्या बजेट इंटेरिम बजेट असलं तरी, निवडणुकीपूर्वीच्या या बजेटमध्ये मोदी सरकार नोकरदारांना आणि छोट्या करदात्यांसाठी खुशखबर देण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांकडून काय माहिती मिळाली आहे?

यंदाच्या बजेट इंटेरिम बजेट असलं तरी, निवडणुकीपूर्वीच्या या बजेटमध्ये मोदी सरकार नोकरदारांना आणि छोट्या करदात्यांसाठी खुशखबर देण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांकडून काय माहिती मिळाली आहे?

  • Share this:
    लक्ष्मण रॉय दिल्ली, 01 फेब्रुवारी : यंदाच्या बजेटमध्ये मोदी सरकार नोकरदारांना आणि छोट्या करदात्यांसाठी खुषखबर देण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे इंटेरिम बजेट असलं, तरीही करदात्यांसाठी दिलासा देणारं असू शकतं. अर्थमंत्रालयाकडून मिळालेल्या सूत्रांकडून मिळालेल्या संकेतांनुसार इन्कम टॅक्स स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतात. टॅक्स स्ट्रक्चर बदलणार? आता सरकारला हे स्ट्रक्चर बदलायचेच असतील, तर अनेक मार्ग आहेत. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणं हा त्यातला एक मार्ग असू शकतो किंवा इन्कम टॅक्स स्लॅब वाढू शकते. उदाहरणार्थ 2.50 लाख ऐवजी टॅक्सची पहिली स्लॅब 5 लाखापर्यंत उत्पन्नाची अस शकते. यामुळे छोट्या करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. स्टँडर्ड डिडक्शन वाढणार? स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सध्या 40,000 रुपये आहे. ही रक्कम आणखी जास्त वाढू शकते. कराचा दर बदणार? तिसरा पर्याय म्हणजे इन्कम टॅक्सचा रेट कमी-जास्त होऊ शकतो. म्हणजे सध्या पहिल्या टप्प्यातल्या करदात्यांसाठी 5 टक्के आणि मग, 20 आणि 30 टक्के असं टॅक्स स्ट्रक्चर आहे. आता या इंटेरिम बजेटमध्ये यात एक स्लॅब वाढू शकते, ज्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना आणखी सवलत मिळेत. तर जास्त उत्तन्न असणाऱ्यांवर कराचा बोजा वाढू शकतो. (लक्ष्मण रॉय CNBC आवाज चॅनेलचे इकॉनॉमिक पॉलिसी एडिटर आहेत.)
    First published: