UNION BUDGET : सोनं झालं महाग, जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत

Union Budget मध्ये सोन्यासह इतर धातूंच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

  • Share this:

स्थानिक सराफ बाजारात सोन्याचा भाव 590 रुपयांनी वाढला. दहा ग्रॅंम सोनं 34 हजार 800 रुपये किंमतीवर बाजार बंद झाला. सोन्याच्या भावात झालेली वाढ 2019-20 च्या बजेटमध्ये सोनं आणि इतर धातूंवर वाढवण्यात आलेल्या आयात शुल्कानंतर झाली.

सरकारने सोनं आणि इतर धातूंवरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 इतकं केलं आहे. स्थानिक बाजारात सोनं आणि दागिणे महाग होतील.

तज्ज्ञांच्या मतानुसार, आयात शुल्क वाढवल्यानं सोनं महाग होईल. यामुळं सोन्याच्या खेरेदीवरही परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेत न्यूयॉर्कमध्ये सोनं 1 हजार 413 डॉलर प्रति औंस आहे. तर चांदीचा दर 15.22 डॉलर प्रति औस आहे.

दिल्लीतील सराफ बाजारात 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या दरात 590 रुपयांनी वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमचा भाव अनुक्रमे 34 हजार 800 आणि 34 हजार 630 रुपये झाला आहे. सोन्याच्या 8 ग्रॅमच्या नाण्याची किंमत 200 रुपयांनी वाढून 27 हजारापर्यंत पोहचली आहे.

देशात गेल्या तीन वर्षांत 982 टन सोनं आयात करण्यात आलं. यात 2017-18 मध्ये 955 टन, 2016-17 मध्ये 778 आणि 2015-16 मधअये 968 टन सोनं आयात करण्यात आलं होतं. सोन्याच्या आयातीनं चालू खात्यात वित्तिय तूट येण्यावर मर्यादा येण्यास मदत होते.

भारत जगातील सर्वात मोठा सोनं आयात करणारा देश आहे. यात सोन्याचा वापर दागिण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात दागिण्यांच्या निर्यातीत घट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या