गेल्या 6 वर्षांत 90 लाखांनी खालावले रोजगार, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गाठला नीचांक

गेल्या 6 वर्षांत 90 लाखांनी खालावले रोजगार, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गाठला नीचांक

भारतात बेरोजगारीचा दर वाढल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा नीचांक गाठल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : भारतामध्ये गेल्या 45 वर्षांत रोजगाराच्या दराचा नीचांक गाठला गेल्याचं NSSO म्हणजेच National Sample Survey Organisation च्या सर्व्हेमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर भारतातल्या रोजगाराच्या स्थितीवर उलटसुलट चर्चा झाल्या.

आता, 2011 - 2012 आणि 2017-2018 या काळात रोजगार 90 लाखांनी खालावला, असं समोर आलं आहे. संतोष मेहरोत्रा आणि जजाती परिडा यांना लिहिलेलं हे संशोधनपत्र अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या शाश्वत रोजगार केंद्राने प्रकाशित केलं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात रोजगाराचा दर इतका खाली गेला आहे, अशी बातमी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिली आहे.

बेरोजगारीचं प्रमाण वाढलं

रोजगारी, मनुष्यबळ, शिक्षण, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हे बाजारपेठेचे निर्देशांक धरले तर बेरोजगारीचं प्रमाण अत्यंत वाढल्याचं दिसून आलं. देशामध्ये असेलल्या रोजगाराच्या संधी, बेरोजगारीचं संकट या सगळ्याचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने देशातल्या रोजगाराच्या स्थितीबद्दल एक अहवाल करण्याचं काम दिलं होतं. लवीश भंडारी आणि अमरेश दुबे या दोघांनी लिहिलेल्या एका अहवालात रोजगारीचं प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांच्या मते, 2011-2012 या काळाच्या तुलनेत 2017-2018 मध्ये रोजगारीचं प्रमाण वाढलं. ते 43.3 कोटींवरून 45.3 कोटींवर गेलं.

(हेही वाचा : सावधान! लाखो भारतीयांच्या डेबिट- क्रेडिट कार्ड डेटाची होतेय चोरी)

ही आहेत कारणं

आता अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेला अहवाल लिहणारे संतोष मेहरोत्रा आणि हे जेएनयूमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. जजाती परिडा हे पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. 2011- 2012 मध्ये असलेल्या 47.4 कोटी रोजगारावरून हा रोजगार 2017-2018 मध्ये 46.5 कोटी रोजगारावर आला, असं त्यांचं म्हणणं आहे. शेतीक्षेत्रात झालेली घसरण, उत्पादनातली घट, तरुणांमधली बेरोजगारी आणि सुशिक्षित तरुणांमधली बेरोजगारी या कारणांमुळे रोजगाराचा दर घटला, असंही त्यांनी म्हटलं आहे.

=========================================================================================

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत, काय म्हणाले शरद पवार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या