देशात वर्षभरात 1. 10 कोटी लोकांचा रोजगार गेला,अर्थव्यवस्था चिंताजनक

देशात वर्षभरात 1. 10 कोटी लोकांचा रोजगार गेला,अर्थव्यवस्था चिंताजनक

जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारताची अर्थव्यवस्थाही गंभीर आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 10 लाख लोकांचा रोजगार गेला,असं आकडेवारी सांगते.

  • Share this:

मुंबई,20 ऑगस्ट : जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारताची अर्थव्यवस्थाही गंभीर आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 10 लाख लोकांचा रोजगार गेला,अशी आकडेवारी आहे.

देशातल्या तरुणांना बेरोजगारीची चिंताही भेडसावते आहे. देशभरात 7 कोटी 80 लाख व्यक्ती बेरोजगार आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून भारताची अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे.

दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्याने तर चारचाकी वाहनांची विक्री २३ टक्याने घटली आहे. बांधकाम क्षेत्रातही मंदी आहे. ३० मोठ्या शहरांत सुमारे साडेचार लाख घरं पडून आहेत. अतिश्रीमंताच्या उत्पन्नावरचा प्राप्तिकर अधिभार वाढवल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातून गुंतवणूक काढली आहे, अशी बातमी दै. लोकमतने दिली आहे.

बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले

सरकारी नोकऱ्यांमध्येही चिंताजनक परिस्थिती आहे. बीएसएनएलकडे १लाख ५४ हजार कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत. १८ सरकारी बँकांचं थकीत कर्जही १० लाख कोटींपेक्षा जास्त झालं आहे.अर्थव्यवस्थेच्या या मंदीबद्दल तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. वित्तीय कंपन्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करणं आणि खासगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, असं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

1 लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, दरमहा मिळवा हजारो रुपये

देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनेही एक विशेष योजना तयार केली आहे. या आराखड्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.यामध्ये सरकारने उद्योगांसाठी कर सवलत, अनुदान अशा योजना आणल्या आहेत. उद्योगांवरचा आर्थिक भार कमी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर भारतात उद्योग करणं उद्योजकांसाठी सोपं व्हावं यासाठीही सरकारने एक प्लॅन बनवला आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी पॅकेजची मागणी

भारतीय औद्योगिक क्षेत्रात मागणी घटल्याबदद्ल चिंता व्यक्त होते आहे. ग्राहकांच्या हाती जास्त पैसे असले तर मागणी वाढेल आणि मालाची विक्रीही होईल. त्यामुळेच अप्रत्यक्ष दरात कपात करण्याचाही सरकारचा विचार आहे. अर्थव्यस्थेला उत्तेजन देण्यासाठी सरकारने पॅकेज द्यावं, असं असोचॅमचे अध्यक्ष बी. के. गोएंका यांचं म्हणणं आहे.

==============================================================================================================

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या