अपस्मारापासून मुक्ती मिळवण्यासाठी तो समजून घेणे

भारतामध्ये हे राक्षस किंवा आत्म्यांमुळे होत असल्याचे समजले जाते, पण यात काहीही तथ्य नाही, याचा मागील आयुष्याशी काहीही संबंध नाही.

भारतामध्ये हे राक्षस किंवा आत्म्यांमुळे होत असल्याचे समजले जाते, पण यात काहीही तथ्य नाही, याचा मागील आयुष्याशी काहीही संबंध नाही.

 • Share this:
  भारतामध्ये, नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जवळपास 13 million लोक अपस्माराला बळी पडतात, परंतु त्यांपैकी केवळ 2.9 million लोकांवरच उपचार होतो2. 1 कोटी अपस्माराच्या रुग्णांचे एकतर निदान होत नाही किंवा त्यांचा औषधोपचारांसह इलाज मिळत नाही. तसेच अपुरी माहिती व त्याच्याविषयीच्या गैरसमजामुळे यावर एक मोठा कलंक लागला आहे2. अपस्मार ही मज्जासंस्थेशी निगडीत एक अवस्था/ आजार आहे, ज्यामध्ये वारंवार फेफरे येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. फेफरे म्हणजे एक असा काळ असतो ज्यामध्ये व्यक्ती नेहमीपेक्षा भिन्न वर्तन करते, भिन्न संवेदन करते आणि कधी कधी तिचे भान हरपते. असे मेंदूवर आघात करणारे घटक जलद गतीने वाढणे, किंवा त्यांची प्रमाणापेक्षा अधिक वाढ होणे यांमुळे घडू शकते1. अपस्मार कशामुळे होतो? अनेक कारणांमुळे अपस्मार होऊ शकतो. यामध्ये ब्रेन ट्यूमर्स, डोक्याला झालेल्या इजा, संसर्ग, आघात किंवा अनुवंशिक परिस्थिती यांमुळे होतो. तरीही, ७० टक्के अपस्माराच्या प्रकरणांमध्ये, प्रौढ व बालकांमध्ये कोणतेही कारण निश्चितपणे सांगता येत नाही. पण, औषधे चुकणे, ताण, काळजी किंवा उत्तेजित होणे, हार्मोनमधील बदल, विशिष्ट अन्नपदार्थ, अल्कोहोल, प्रकाश संवेदनक्षमता आणि संगीत ही यातील सर्वसामान्य कारणे आहेत. अपस्मारातील मुख्य आव्हाने: अपस्माराचा जास्तीत जास्त विचार केला असता, निदान ही एक समस्या आहे. या परिस्थितीच्या भवताली असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक समस्या किंवा निर्बंध/ दंतकथा तसेच खूप साऱ्या गैरसमजांमुळे असे घडते. कधी कधी या परिस्थितीचे वैद्यकीय निदान अचूक न झाल्याने चुकीच्या किंवा विलंबाने होणाऱ्या उपचारांमुळे समस्या उद्भवतात. अपस्मार ही एक सामान्य परिस्थिती आहे जी आपल्याला पुरेशी समजलेली नाही आणि मोठ्या प्रमाणात आढळत असली तरीही त्यावर चांगले उपचार होत नाहीत. अपस्मारग्रस्त लोकांना जीवनाचा आरोग्यविषयक वाईट दर्जा यांसारख्या आरोग्यविषयक व सामाजिक विषमतेचा सामना करावा लागतो7. अपस्मारावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती सहसा त्याच्या दूरगामी परिणामांच्या किंवा अपस्माराच्या कलंकाच्या भीतीने आपल्या फेफरे येण्याच्या आजाराविषयी बोलत नाहीत किंवा आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांपाशी उघड करत नाहीत. असे करू नका. आपल्या मित्र आणि कुटुंबाला हे सांगा आणि समाजानेही अपस्माराच्या रुग्णांना अपसामान्य समजणे थांबविले पाहिजे. भारतामध्ये हे राक्षस किंवा आत्म्यांमुळे होत असल्याचे समजले जाते, पण यात काहीही तथ्य नाही, याचा मागील आयुष्याशी काहीही संबंध नाही. ही शास्त्रीयदृष्ट्या मज्जासंस्थेशी निगडीत समस्या आहे - ही योग्य उपचारांच्या मदतीने नियंत्रित करता येते. अपस्माराच्या संक्रमणाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या अभ्यासामध्ये सहभागी प्रयुक्तांपैकी महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अपस्माराचा एकूण प्रादुर्भाव थोडासा जास्ती होता. 2 जर आपल्याला आपल्या आप्तांपैकी कोणाला अपस्मार असल्याचे वाटत असेल तर, तर त्याविषयी आपल्या डॉक्टरशी चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे. असामान्य फेफऱ्यांचे झटके येण्याची वारंवारिता किती आहे, दिवसातून कितीवेळा येतात आणि त्यांचे स्वरूप कसे असते, याची नोंद ठेवा. यामुळे आपल्या डॉक्टरना तुम्ही सांगत असलेली लक्षणे अपस्माराची आहेत की नाही हे ठरवण्यासाठी उपयोग होईल. झटके येण्याचे स्वरूप नेमके कसे असते व ते येण्यापूर्वी नक्की काय घडते याबद्दलची जास्तीत जास्त माहिती असलेली एक काळजीपूर्वक बनवलेली मेडिकल हिस्टरी हे एखाद्या डॉक्टरकरिता अपस्माराचे निदान करण्यासाठीचे पहिले साधन असते. जर आपल्या जीवनातील कोणाला अपस्माराचे निदान झाले असेल तर त्यांना आधार देणे आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक आहे. 30 ते 40 टक्के अपस्मार हा अनुवंशिक पूर्वस्थितीमुळे निर्माण होतो. अनुवंशिक अपस्मार असलेल्या लोकांच्या पहिल्या घेऱ्यातील नातेवाईकांमध्ये दुप्पट ते चौपट इतका अपस्माराचा धोका वाढतो5. फेफरे/फिट्सचे एखाद्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून उपचार केले पाहिजेत, जेणेकरून रुग्णाचे अचूक निदान होऊन त्याला योग्य वेळी अचूक उपचार प्राप्त होतील. शक्य असल्यास, योग्य उपचार ठरवून देण्यामध्ये मदत करू शकणाऱ्या न्युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. अपस्माराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांसाठी आपण काही विशेष सल्ला देऊ इच्छिता का? अशा परिस्थितीमध्ये एका काळजीवाहू व्यक्तीची भूमिका कशी असेल? काळजी घेणाऱ्या व्यक्तीने अशा मुलांकडे लक्ष दिले पाहिजे व त्या मुलाला बऱ्याच वेळासाठी संपूर्णपणे एकटे/ दुर्लक्षित ठेवू नये. ते मुल कोणत्या गोष्टीमुळे उत्तेजित होते हे लक्षात घेऊन त्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. त्या मुलाच्या शिक्षक/पालकांना त्याच्या वैद्यकीय समस्येविषयी माहिती असल्याची खात्री करा आणि आपत्कालीन संपर्कासाठी त्यांना आवश्यक ते तपशील द्या. औषधोपचार वेळच्या वेळी होत असल्याची आणि आवश्यक त्या फॉलो-अप व्हिजिट्स/ तपासण्या होत असल्याची खात्री करा. धोके जाणून घ्या आणि कोणत्याही प्रकारचा धोका वाटल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जा. मुलाला फेफरे आलेले असताना त्यांना तोंडावाटे काहीही( पाणी, टॅबलेट्स, सिरप) देणे टाळा आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात न्या. याचे महिलांवर काही वेगळे परिणाम होतात का? आणि याचे काही दूरगामी परिणाम असतात का - त्यांच्या एकून आरोग्याविषयी किंवा अगदी त्यांच्या गर्भधारणेच्या क्षमतेविषयीही मार्गदर्शन करा. मुली/ महिलांमधील अपस्माराच्या रुग्णांविषयीच्या सामाजिक-सांस्कृतिक गैरसमजांबाबत त्यांच्या कुटुंबसदस्यांशी बोलून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. घरातून चांगला पाठींबा देऊन जर उपचार आणि आवश्यक काळजी घेतली गेली तर त्या जवळपास सामान्य जीवन जगू शकतात. अपस्मारग्रस्त महिला अपस्मार नसलेल्या अन्य महिलांप्रमाणेच गरोदर राहू शकतात. गरोदरपणाचा आपस्मारावर कसा परिणाम होईल हे सांगणे तसे कठीण आहे. काही महिलांच्या बाबतीत त्यांच्या अप्स्मारावर परिणाम झाला नाही पण काहींच्या बाबतीत त्यांची परिस्थिती सुधारली. तथापि, गरोदरपणामुळे शारीरिक आणि भावनिक तणाव वाढू शकतो, थकवा वाढतो तसेच फेफरे येण्याची वारंवारीता आणि तीव्रता वाढू शकते. कोणतीही जोखीम कमी करण्यासाठी, आपण गर्भवती होण्यापूर्वी किंवा आपण बाळाला जन्म देण्याचे ठरवत असल्यास, तत्पूर्वी आपल्या न्यूरोलॉजिस्टशी आपल्या औषधांबद्दल बोला. ते कदाचित आपणास पर्यायी उपचार देऊ इच्छित असतील. गरोदरपणादरम्यान ओनातेही बदल करण्यापेक्षा त्यापूर्वीच औषधोपचारात काही बदल करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. अपस्माररोधक औषधोपचार चालू असताना आपणास गर्भ राहिला, तर ते औषधोपचार तसेच चालू ठेवा आणि त्वरित आपल्या उपचारांविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या जीपी किंवा तज्ञाशी संपर्क साधा. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय आपले औषधोपचार बदलू नका किंवा आपली औषधे घेणे थांबवू नका, विशेषत: गर्भधारणेदरम्यान. कारण, गरोदरपणातील एखाद्या तीव्र झटक्यामुळे तुम्हांला किंवा तुमच्या बाळाला इजा किंवा दुखापत होऊ शकते9. अपस्माराच्या रुग्णांना सामान्य जीवन जगणे शक्य आहे का? त्यांच्या जीवनाच्या दर्जावर काय परिणाम होऊ शकतो? वैद्यकीय व्यावसायिकांकडून योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेऊन अपस्माराचे बरेचसे रुग्ण निरोगी व सामान्य जीवन जगू शकतात8,10. याची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या न्युरोलॉजिस्टचा त्वरीत सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हे Abbott India च्या ‘जॉईन सीझर फ्रीडम मुव्हमेंट – ट्रीट इट टू डिफिट इट’ या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. ही भागीदारीची पोस्ट आहे. Disclaimer: ** This is in partnership with Abbott India, written by Dr. Rahul Baviskar, Consultant Neurologist & Epileptologist, Neurocare, Nashik. Information appearing in this material is for general awareness only and does not constitute any medical advice. Please consult your doctor for any questions or concerns you may have regarding your condition. References:
  • 1 National Center for Chronic Disease Prevention and Health Promotion, Division of Population Health. https://www.cdc.gov/epilepsy/about/faq.htm
  • 2Santhosh NS, Sinha S, Satishchandra P. Epilepsy: Indian perspective. Ann Indian Acad Neurol. 2014;17(Suppl 1):S3-S11.
  • 5https://www.uchicagomedicine.org/conditions-services/neurology-neurosurgery/epilepsy-seizures/causes
  • 6
  • 7 Durugkar S, Gujjarlamudi HB, Sewliker N. Quality of life in epileptic patients in doctor's perspective. Int J Nutr Pharmacol Neurol Dis 2014;4:53-7
  • 8 Shetty PH, Naik RK, Saroja A, Punith K. Quality of life in patients with epilepsy in India. J Neurosci Rural Pract. 2011;2(1):33-38.
  • 9 Jacqueline French, Cynthia Harden, Page Pennell, Emilia Bagiella, Evie Andreopoulos, Connie Lau, Stephanie Cornely, Sarah Barnard, and Anne Davis; Neurology April 5, 2016 vol. 86 no. 16 Supplement I5.001
  • 10 https://www.nebraskamed.com/neurological-care/epilepsy/with-right-treatment-most-epilepsy-patients-can-live-normal-lives
  • 11 https://www.aans.org/en/Patients/Neurosurgical-Conditions-and-Treatments/Epilepsy
  First published: