मुंबई, 28 डिसेंबर : बिटकॉइन (Bitcoin) किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः तरुण लोक मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र आपल्या देशात अजूनही क्रिप्टोकरन्सीबाबत धोरणात्मक अनिश्चितता आहे.
गुंतवणूकदाराने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये (Investors Portfolio) किती क्रिप्टो ठेवावे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. तज्ञांनी सुचवले की सद्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 5-10 टक्के क्रिप्टो ठेवावे. त्यांनी गुंतवणूकदारांना संपूर्ण पैसे गमावण्याच्या जोखमीवरच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.
सरकारचे धोरण आल्यानंतर क्रिप्टोमधील गुंतवणुकीची स्थिती अधिक स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले. मोदी सरकार हिवाळी अधिवेशनातच (Winter Session) क्रिप्टोकरन्सीसंदर्भात एक विधेयक (Bill About Cryptocurrency) आणणार होते, परंतु अलीकडील अहवालानुसार, सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो एक्सचेंजचे नियमन (Regulation of cryptocurrency and crypto exchange) करण्यासाठी विधेयक आणू शकते.
Income Tax ची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील 'हे' व्यवहार तर येईल नोटीस; वाचा नियम
क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
>> तज्ज्ञांच्या मते, पहिल्यांदाच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना ब्लू चिप क्रिप्टो अॅसेट्सचा विचार केला पाहिजे. त्यांचे मार्केट कॅप जास्त आहे म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार त्यांचे क्रिप्टो होल्डिंग्स विकतात तेव्हा त्यांना त्यांचे ग्राहक सहज मिळतील.
>> Reddit, Twitter आणि इतर इन्फ्लुएन्सर यांसारख्या सोशल मीडियाच्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदारांनी क्रिप्टो खरेदी-विक्रीचे निर्णय घेऊ नये.
>> गुंतवणूक करण्यापूर्वी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक का करावी याचे उत्तर शोधावे. फायद्यासाठी तत्काळ गुंतवणूक करायची असेल तर तोटा होण्याची शक्यता वाढते. तज्ञ गुंतवणूकदारांना क्रिप्टोमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. सुरुवातीला 2-5 टक्के भांडवलाने सुरुवात करून नंतर नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
>> क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विश्वसनीय एक्सचेंज निवडा. विश्वसनीय एक्सचेंज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर योग्य माहिती घेऊनच क्वॉईन लिस्ट करतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा धोका कमी होतो.
>> गुंतवणुकदारांनी क्रिप्टो अॅसेटमध्ये उपलब्ध टोकन मर्यादा देखील पाहावी. बिटकॉइन सारख्या अनेक क्रिप्टो अॅसेटचं सप्लाय लिमिटेड आहे परंतु Dogecoin ला कमाल मर्यादा नाही.
>> गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कॉईनचा सप्लाय तसेच त्याची विश्वासार्हता आणि त्याचे संस्थापक यांचा विचार करावा.
यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर
क्रिप्टोकरन्सी कुठे ठेवायची?
तुम्ही दीर्घकाळ क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास, तुम्ही तुमची क्रिप्टो अॅसेट स्टोअर करण्यासाठी हार्डवेअर अॅसेट्सचा विचार केला पाहिजे. मात्र जर तुम्ही अल्प मुदतीसाठी किंवा अल्प भांडवलासाठी गुंतवणूक करत असाल तर विश्वासार्ह विनिमय हा एक चांगला पर्याय असेल.
जर पोर्टफोलिओ लहान असेल तर क्रिप्टो अॅसेट एक्सचेंज वॉलेटमधून हार्डवेअर वॉलेटमध्ये हलवण्याची गरज नाही कारण या ट्रान्सफरमध्ये ट्रान्जॅक्शन चार्जचाही समावेश असतो. जर क्रिप्टोमध्ये गुंतवलेले भांडवल जास्त असेल तर ते ट्रान्सफर करणे चांगले आहे. एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी निश्चित ट्रान्जॅक्शन चार्ज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cryptocurrency, Investment