PM Kisan Yojna: पीएम किसान योजनेअंतर्गत 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, 12वा हप्ता लवकरच जमा होणार
PM Kisan Yojna: पीएम किसान योजनेअंतर्गत 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, 12वा हप्ता लवकरच जमा होणार
PM Kisan
PM Kisan Yojna: प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते.
मुंबई, 3 ऑगस्ट : देशातील गरजू शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वेळेवर पैसे मिळावेत या उद्देशाने केंद्र सरकारने पीएन किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरच पुढील 12 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना 2000 रुपये बँक खात्यात जमा होतात, मात्र यावेळी काही शेतकऱ्यांना दोन हजारांऐवजी चार हजार रुपये मिळू शकतात.
प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते. अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 2,000 रुपये आलेले नाहीत. अशा परिस्थितीत 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी देण्यात येतील. म्हणजेच, दोन्ही हप्त्यांमध्ये 2000-2000 रुपये जोडून, 4,000 रुपये त्याच्या खात्यात जमा होऊ शकतात. मोठी रक्कम खात्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल, जुळ्या मुली असल्यास दोघींना मिळणार लाभ12वा हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेच्या पुढच्या म्हणजेच 12व्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर लवकरच शेतकर्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. शेवटचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता केंद्र सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता. त्यावेळी दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते.
Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज कराबेकायदेशीर लाभार्थ्यांना नोटीसा
गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सरकारची अशी फसवणूक करणार्यांवर कडक कारवाई होऊ शकते. सरकार अशा लोकांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवत आहे. हे पैसे त्वरित परत करावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. पैसे परत न केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.