मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 300 सुट्ट्या? ऑक्टोबरपासून लागू होऊ शकतात नवे नियम

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 300 सुट्ट्या? ऑक्टोबरपासून लागू होऊ शकतात नवे नियम

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये हा नियम लागू केला जाऊ शकतो. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार, सुट्ट्या यात बदल होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये हा नियम लागू केला जाऊ शकतो. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार, सुट्ट्या यात बदल होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये हा नियम लागू केला जाऊ शकतो. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार, सुट्ट्या यात बदल होतील.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 जुलै: देशात नव्या वेज कोडबाबत (New Wage Code) मोठी चर्चा आहे. हा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू केला जाणार होता. परंतु काही कारणांनी हा नियम लागू होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी Earned Leave वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये हा नियम लागू केला जाऊ शकतो. तोपर्यंत सर्व राज्य सरकार आपले ड्राफ्ट रुल्स तयार करेल. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार, सुट्ट्या यात बदल होतील.

नव्या वेज कोडमध्ये केलेल्या तरतुदींमुळे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सॅलरी क्लास, मिल आणि फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजूरांवरही याचा परिणाम होईल. कर्मचाऱ्यांच्या सॅलरीपासून त्यांच्या सुट्ट्या आणि कामाच्या तासांमध्येही बदल होतील.

नव्या तरतुदीनुसार, कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. मूलभूत वेतन कमी ठेवण्यासाठी कंपन्या आतापर्यंत भत्ता वेगवेगळ्या भागात विभागत होत्या. यामुळे PF मध्ये कमी पैसे जमा होतात. आता नव्या लेबर कोडनुसार, 50 टक्के ग्रॉस सॅलरीवर पीएफ जमा करावा लागेल. जर हा नियम लागू झाला, तर हातात येणारा पगार कमी होईल, तर कंपन्यांकडून मिळणारा पीएफ वाढेल. नवा नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना संपूर्ण सॅलरी स्ट्रॅक्चर बदलावं लागेल.

सुट्ट्या -

कर्मचाऱ्यांच्या Earned Leave अर्थात सुट्ट्या 240 वरुन 300 पर्यंत होऊ शकतात. लेबर कोड नियमांमध्ये बदलांबाबत श्रम मंत्रालय, लेबर युनियन आणि उद्योग जगतातील प्रतिनिधींमध्ये अनेक तरतुदींवर चर्चा झाली. ज्यात कर्मचाऱ्यांची Earned Leave 240 वरुन 300 केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वेज कोड अंतर्गत, कामाचे तास 12 तास होऊ शकतात. श्रम मंत्रालयाने प्रस्तावित लेबर कोडमध्ये सांगितलं, की आठवड्यात 48 तास कामाचा नियम लागू राहील. काही युनियन 12 तास काम आणि 3 दिवसांच्या सुट्टीच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. परंतु सरकारने आठवड्याला 48 कामाचा नियम राहणार असून एखादा व्यक्ती 8 तास काम करत असल्यास, त्याला आठवड्यातून 6 दिवस काम करावं लागेल आणि एक सुट्टी मिळेल. तसंच जर 12 तास दिवसाला काम करत असल्यास, बाकी 3 दिवस सुट्टी द्यावी लागेल. कामाचे तास वाढल्यास, कामाचे दिवसही 6 ऐवजी 5 किंवा 4 होतील. यासाठी कर्मचारी आणि कंपनी दोघांमध्ये सहमती असणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Job, Money