• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • LIC कडे तुमचे पैसे पडून तर नाहीत? घरबसल्या करा चेक

LIC कडे तुमचे पैसे पडून तर नाहीत? घरबसल्या करा चेक

LIC, IRDAI, Life Insurance - देशातल्या विमा कंपन्यांकडे 16887.66 कोटी रुपये बेवारस पडलेत. सप्टेंबर 2018पर्यंतची ही आकडेवारी आहे

 • Share this:
  मुंबई, 02 जुलै : देशातल्या विमा कंपन्यांकडे 16887.66 कोटी रुपये बेवारस पडलेत. सप्टेंबर 2018पर्यंतची ही आकडेवारी आहे. भारतीय विमा नियामक म्हणजेच विकास प्राधिकरणा ( IRDAI )नं विमा कंपन्यांना विमाधारकांची ओळख करून घ्यायला सांगितलंय. त्यांचे पैसे परत करायचे आदेशही  दिलेत. तुमचे पैसे LIC किंवा अजून कुठल्या विमा कंपनींकडे आहे, हे कसं जाणून घ्यायचं ते पाहा - कसं जाणून घ्यायचं? IRDAI नं विमा कंपन्यांना आपल्या वेबसाइटवर सर्ज ही सुविधा द्यायला सांगितलीय. यामुळे पाॅलिसीधारक कंपनीकडे आपली काही रक्कम तर पडून नाही ना, याचा पत्ता लावू शकतात. मुंबईत 45 वर्षानंतर झाला तुफान पाऊस, पाहा आजच्या 'तुंबई'चे 45 PHOTOS पाॅलिसीधारक, लाभार्थी यांना बिना दावा असणारी रक्कम आहे का हे जाणून घेण्यासाठी पाॅलिसी नंबर, पाॅलिसीधारकाचा पॅन, त्याचं नाव, आधार नंबर ही माहिती भरावी लागेल. ही माहिती त्यांना सहा महिन्यात द्यावी लागेल. सर्ल कंपनींच्या वेबसाइटवर ही सुविधा उपलब्ध आहे. LIC ची लिंक ही आहे. https://customer.onlinelic.in/LICEPS/portlets/visitor/unclaimedPolicyDues/UnclaimedPolicyDuesController.jpf #MissionPaani: जल संकट टाळण्यासाठी मोदी सरकारचा हा आहे 'मास्टर प्लान' कुणाचे किती पैसे अनक्लेम्ड? इन्शुरन्स क्षेत्रात सप्टेंबर 2018पर्यंत लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात 16887.66 कोटी रुपये अनक्लेम्ड होते. तर नाॅन लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात ही रक्कम 989.62 कोटी रुपये आहे. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; धावपट्टीवरून विमान... या रकमेचं काय होतं? IRDAI नं एक पत्रक जारी केलं होतं. यात सर्व विमा कंपन्यांना आदेश दिले होते की , 30 सप्टेंबर 2017 पर्यंत 10 वर्षांपेक्षा जास्त काळात पाॅलिसीधारकांनी दावा न केलेली रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषात भरावी. हे काम मार्च 2018पर्यंत करायचे आदेश होते. पैसे का पडून राहतात? याला अनेक कारणं आहेत. अनेकदा विमाधारकाच्या नाॅमिनीला हे माहीतच नसतं. विमा डाॅक्युमेंट्स मिळत नाहीत. म्हणूनच विमाधारकांनं नाॅमिनीला विम्याची माहिती तर द्यावीच. पण कागदपत्रं कुठे ठेवलीयत, तेही सांगावं. चेक पेमेंटनं जास्त वेळ जातो. म्हणून हल्ली बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्राॅनिक व्यवस्था सुरू केलीय. 2014 नंतरच्या विमा पाॅलिसीमध्ये विमा कंपन्या इलेक्ट्राॅनिक ट्रान्सफरवर जोर देतात. VIDEO: आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर
  Published by:Sonali Deshpande
  First published: