नवी दिल्ली, 20 एप्रिल : आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका असणारा उद्योगपती विजय माल्ल्या याला आता भारतात परतण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भारतात परतल्यावर अटक होईल म्हणून देशाबाहेर असलेल्या माल्ल्यानं स्वतःच्या प्रत्यार्पणाविरोधात दावा दाखल केला होता. पण त्याचा हा दावा फेटाळण्यात आला असून त्याला प्रत्यर्पण करावंच लागेल.
तब्बल 9000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप माल्ल्यावर आहे. तो गेले काही दिवस ब्रिटनच्या आश्रयाला आहे. पण विजय माल्ल्याचं प्रत्यार्पण करावं, असं भारताने सांगितल्यानंतर त्याने ब्रिटनच्या कोर्टात याविरोधात याचिका दाखल केली होती. लंडनच्या कोर्टाने त्या याचिकेवर आज निकाल दिला. या निकालानुसार माल्ल्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Liquor tycoon Vijay Mallya loses his High Court appeal in UK against his extradition order to India
भारतातून फरार घोषित करण्यात आलेल्या किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याने पुन्हा एकदा 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची भाषा केली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत ट्वीट करत त्याने, हे वक्तव्य केले आहे. ट्विटरवर विजय माल्ल्याने लिहिलं आहे की, भारत सरकार आणि ईडी (Enforcement Department –ED) त्याची मदत करत नाही आहेत.
Indian Government has done what was unthinkable in locking down the entire Country. We respect that. All my Companies have effectively ceased operations. All manufacturing is closed as well. Yet we are not sending employees home and paying the idle cost. Government has to help.