पैसे कमवण्याची नामी संधी, या बँकेचा IPO झाला जाहीर

पैसे कमवण्याची नामी संधी, या बँकेचा IPO झाला जाहीर

IPO मध्ये तुम्ही थेट गुंतवणूक करू शकता. यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. यामध्ये ब्रोकरच्या माध्यमातूनही गुंतवणूक करता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचं इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO आजपासून खुला झालाय. या IPO मध्ये 4 डिसेंबरपासून नोंदणी केली जाऊ शकते.

उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेसची सब्सिडरी कंपनी USFB चं 750 कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य आहे. या IPO मध्ये घाऊक पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के भाग राखीव ठेवण्यात आला आहे.

या IPO च्या खास गोष्टी

उज्जीवन स्माल फायनान्स बँकेच्या IPO चा प्राइस बँड 36 ते 37 रुपये प्रति शेअर एवढा ठरवण्यात आला आहे. या इश्यूमध्ये कमीतकमी 400 इक्विटी शेअर्सासाठी बोली लावावी लागेल. यानंतप 400 शेअर्सच्याच पटीत अर्ज करता येईल. यासाठी 14 हजार 800 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. IPO च्या आधी USFB मे याच महिन्यात प्री आयपीओ राउंडमझ्ये 250 कोटी रुपयांची संपत्ती जमवली होती.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ही उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेसची सब्सिडरी कंपनी आहे. या कंपनीने 2016 मध्ये पब्लिक कंपनी म्हणून कारभार सुरू केला. सध्या 24 शहरांमध्ये या कंपनीच्या 552 शाखा आहेत आणि 441 ATM आहेत.

(हेही वाचा : कधीकाळी खाण्यासाठी नव्हते पैसे, त्यांच्याच Paytm कंपनीत होतेय मोठी गुंतवणूक)

IPO मध्ये गुंतवणूक कशी कराल?

IPO मध्ये तुम्ही थेट गुंतवणूक करू शकता. यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. यामध्ये ब्रोकरच्या माध्यमातूनही गुंतवणूक करता येईल.

एवढी गुंतवणूक करू शकता

IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. IPO मध्ये एका शेअरसाठी मोठी बोली लावता येत नाही. एका वेळी यात 14 हजार 800 रुपये गुंतवता येतील.

===================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 2, 2019, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading