नवी दिल्ली, 07 जुलै: तुम्हाला देखील आधार (Aadhaar Card) अपडेट करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. UIDAI ने आधार संबंधित दोन सेवा बंद केल्या आहेत. याचा परिणाम सर्व आधार कार्डधारकांवर होणार आहे. UIDAI ही आधार कार्ड जारी करणारी संस्था आहे, ज्याद्वारे यासंबंधित विविध सेवा सुरू केल्या जातात. मात्र यावेळी दोन विशेष सेवांना अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
UIDAI ने Address Validation Letter च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे. याशिवाय जुन्या पद्धतीने Aadhaar Card Reprint ची सेवा देखील बंद केली आहे.
1. Address Validation Letter
UIDAI ने अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरच्या माध्यमातून आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे. एखाद्या ठिकाणी राहणारे भाडेकरू किंवा अन्यही कोणते आधार कार्डहोल्डर या सुविधेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकत असत. UIDAI ने साइटवरून देखील Address Validation Letter चा पर्याय हटवला आहे.
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अपडेशनसाठी इतर पर्याय वापरू शकता. व्हॅलिड अॅड्रेस प्रूफच्या या लिस्टमधून (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf) कोणत्याही एका अॅड्रेस प्रूफच्या साहाय्याने तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करू शकता.
हे वाचा-Post Office ची बंपर ऑफर! केवळ 5 वर्षात बनेल 14 लाखांचा फंड, वाचा सविस्तर
ग्राहकांवर काय होणार परिणाम?
खासकरून भाड्याने राहणाऱ्या ग्राहकांवर याचा परिणाम होईल. या लोकांना आधार कार्डावरील पत्ता अपडेट करताना समस्या येऊ शकतात. याशिवाय ज्या लोकांकडे पत्ता बदलण्यासाठी कोणतंही कागदपत्र नाही आहे त्यांना देखील समस्या येऊ शकतात.
2. Aadhaar Card Reprint
याशिवाय जुन्या पद्धतीने Aadhaar Card Reprint ची सेवा देखील बंद केली आहे. सुरुवातील एक मोठं आधार कार्ड UIDAI जारी करत असे आणि ते रिप्रिंट करण्याची सुविधा देखील मिळत असे. मात्र आता याजागी प्लास्टिकचं PVC Card जारी केलं जातं. हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणे असतं. पॉकेट किंवा वॉलेटमध्ये सहज राहणारं हे कार्ड जारी केल्यानंतर UIDAI ने जुन्या पद्धतीचं कार्ड बंद केलं आहे.
हे वाचा-SBI Alert : केवळ एक SMS करेल तुमचं खातं रिकामं, बँकेने ग्राहकांना दिला इशारा
ट्विटरवर एका युजरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना Aadhaar Help Centre ने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे की, Order Aadhaar Reprint सर्व्हिस सुरू ठेवण्यात येणार नाही आहे. या बदल्यात तुम्ही Aadhaar PVC Card ऑनलाइन ऑर्डर करू शकता. तर आवश्यक असल्यास तुम्ही E-Aadhaar ची प्रिंट काढून ते पेपर फॉरमॅटमध्ये ठेवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.