मराठी बातम्या /बातम्या /मनी /UIDAI: आधारशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या तुम्हाला फायदा की नुकसान

UIDAI: आधारशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या तुम्हाला फायदा की नुकसान

आधारकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज असून, वैध ओळखपत्र म्हणून सर्वत्र त्याचा वापर करता येतो.

आधारकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज असून, वैध ओळखपत्र म्हणून सर्वत्र त्याचा वापर करता येतो.

आधारकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज असून, वैध ओळखपत्र म्हणून सर्वत्र त्याचा वापर करता येतो.

  नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : प्रत्येक भारतीय नागरिकाकडे (Indian Citizen) आधार कार्ड (Aadhar Card) असणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी (UIDAI) या आधारकार्ड जारी करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपलं आधारकार्ड बनवून घेऊ शकतो. व्यक्तीचं नाव, पत्ता, जन्मतारीख यासह बायोमेट्रिक माहिती (Biometric Information) घेऊन आधारकार्ड तयार केलं जातं. प्रत्येक व्यक्तीला एक आधार क्रमांक दिला जातो. त्यामुळे फसवणूक होऊ शकत नाही. आधारकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज असून, वैध ओळखपत्र म्हणून सर्वत्र त्याचा वापर करता येतो. कोणत्याही सरकारी कामासाठी, आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांना आधार कार्ड बनवून घेता यावं यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नुकतंच यासाठीचं पडताळणी शुल्क (Authentication Charges) अत्यंत कमी करण्यात आलं आहे. 'अमरउजाला'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  आता भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटीनं (UIDAI) ग्राहकांच्या आधार पडताळणीसाठीची रक्कम 20 रुपयांवरून फक्त 3 रुपये केली आहे. NPCI-IAMAI द्वारे आयोजित जागतिक फिनटेक फेस्टमध्ये (Fintech Fest) भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटीचे सीईओ सौरभ गर्ग (CEO Saurabh Garg) यांनी ही घोषणा केली. यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधार कार्ड बनवताना प्रत्येक व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती म्हणजे डोळ्याचं स्कॅन आणि बोटांचे ठसे घेतले जातात. ही बायोमेट्रिक माहिती अत्यंत सुरक्षित ठेवली जाते, असंही गर्ग यांनी सांगितलं.

  आधार प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख पडताळणी केली जाते. आतापर्यंत 99 कोटी ई-केवायसीसाठी (E Kyc) आधार प्रणालीचा वापर करण्यात आला असल्याचंही गर्ग यांनी या वेळी सांगितलं. आर्थिक क्षेत्रात आधारला मोठी संधी आहे. यासह ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटीनं ही प्रक्रिया आणखी सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

  हे ही वाचा-सरकारी योजनेत फक्त 420 रुपये भरून मिळवा दरमहा 10000 रुपये; जाणून घ्या खास स्कीम

  आधार कार्ड बनवून घेण्यासाठी घरबसल्याही तुम्हाला ऑनलाइन अपॉइंटमेंट (Online Appointment) घेता येते. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.  साठी प्रथम तुम्हाला UIDAI च्या https://uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘My Aadhaar’ टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्याचा पर्याय मिळेल. तो निवडल्यानंतर तुम्हाला शहराच्या स्थानाचा पर्याय मिळेल. ते निवडल्यानंतर ‘प्रोसेस टू बुक अॅन अपॉइंटमेंट’ वर क्लिक करावं. आता एक नवीन पेज उघडेल. त्यावर न्यू आधार, आधार अपडेट आणि मॅनेज अपॉइंटमेंट असे तीन पर्याय असतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. योग्य पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. तुम्हाला भेटीसाठी उपलब्ध वेळेचा स्लॉटदेखील निवडावा लागेल. हे सर्व झाल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करावं. तुमची अपॉइंटमेंट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

  First published:
  top videos

   Tags: Aadhar card, M aadhar card