मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आधार कार्डद्वारे फसवणूक टाळण्यासाठी हा पर्याय लगेच वापरा; UIDAI चा युजर्सला सल्ला

आधार कार्डद्वारे फसवणूक टाळण्यासाठी हा पर्याय लगेच वापरा; UIDAI चा युजर्सला सल्ला

आधार युजर्सने आधारच्या सुरक्षेबाबत सदैव दक्ष असले पाहिजे.

आधार युजर्सने आधारच्या सुरक्षेबाबत सदैव दक्ष असले पाहिजे.

आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यूआयडीएआयने लोकांना आधारपासून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : देशातल्या सर्व वयोगटांतल्या नागरिकांसाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा आणि अत्यावश्यक दस्तावेज आहे. बँकिंग, शासकीय कामं, योजनांचा लाभ घेण्यासाठी तसंच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड गरजेचं असतं. अलीकडच्या काळात आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आधार कार्ड जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) लोकांना फसवणुकीच्या घटना टाळण्याकरिता सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आधार कार्डशी संबधित माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असंदेखील `यूआयडीएआय`नं म्हटलं आहे.

आधार कार्ड महत्त्वाच्या दस्तावेजांपैकी आहे. बँकेशी संबंधित कामांसाठी अथवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड जरूरी असतं. आता आधार कार्ड हे केवळ मोठ्यांसाठीच नाही तर लहान मुलांसाठीदेखील महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुमच्यासोबत आधारशी संबंधित फसवणुकीची घटना घडली असेल तर त्यासाठी देखील `यूआयडीएआय`नं काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.

वाचा - आधार कार्ड गहाळ किंवा खराब होण्याची भीती? घरबसल्या डाउनलोड करा व्हर्च्युअल कॉपी

आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. देशभरात आधारशी निगडीत फसवणुकीच्या घटना वाढल्यानं नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आधार कार्डच्या 12 अंकी क्रमांकाच्या सहाय्याने बॅंक खातं हॅक कसं होऊ शकतं, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. यावर `यूआयडीएआय`नं सांगितलं की, जर एखाद्या व्यक्तीला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक समजला तर तो केवळ त्या क्रमांकाच्या आधारे तुमचं बॅंक खातं हॅक करू शकत नाही. परंतु, जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अधिक सुरक्षित बनवायचं असेल तर तर तुम्ही मास्क्ड आधार कार्ड तयार करून घेऊ शकता. मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमच्या आधारमधील 12 अंकांपैकी सुरुवातीचे आठ अंक दिसत नाहीत तर केवळ शेवटचे चार अंक दिसतात.

आधार कार्डशी निगडीत फसवणुकीच्या वाढलेल्या घटना पाहता, `यूआयडीएआय`ने लोकांना सल्ला दिला आहे. त्यात `यूआयडीएआय`नं म्हटलं आहे की ई-आधार डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे, किऑस्क किंवा अन्य सार्वजनिक कम्प्युटरचा वापर करू नये. जर ई-आधार डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे सार्वजनिक कम्प्युटर वापरण्याशिवाय अन्य दुसरा पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्ही ज्या कम्प्युटरवर महत्त्वाच्या कामासाठी ई-आधारकार्ड डाउनलोड केलं आहे, ती फाईल त्या कम्प्युटरवर ठेवू नये. काम संपल्यावर ती फाईल तातडीनं डिलीट करावी. ई-आधार कॉपी डिलीट केल्यानंतर रिसायकल बिनमधली फाईलही डिलीट करावी. यामुळे आधार कार्डचा अन्य कोणीही गैरवापर करण्याची शक्यता बाकी राहत नाही.

First published:

Tags: Aadhar card