नवी दिल्ली, 22 जानेवारी : आधार कार्ड हे महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्डाची गरज लागते. यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डाशी लिंक होणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा मोबाइल नंबर काही कारणाने बदलला असेल तर तुमचा आधार नंबर डेटाबेसमध्ये अपडेट करा.UIDAI ने तुमचा आधार नंबर डेटाबेसमध्ये अपडेट करण्याबद्दल माहिती दिली आहे. UIDAI ने याबद्दल एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, तुम्हाला आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जवळच्या सेवा केंद्रात जा आणि मोबाइल नंबर अपडेट करण्याचा अर्ज द्या.
#AadhaarUpdateChecklist
— Aadhaar (@UIDAI) January 21, 2020
No document required to update mobile number in Aadhaar. Just carry your Aadhaar to any nearby Aadhaar Kendra and place an update request.
(Charges: Rs. 50). Get details of nearby Aadhaar Kendra from: https://t.co/oCJ66DD0fK pic.twitter.com/39HBo0netQ
मोबाइल नंबर अपडेट करणं का गरजेचं ? आधार कार्डावरचा मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करायचे आहेत. तुम्ही आधार नंबरचा वापर एखाद्या व्हेरिफिकेशनसाठी करणार असाल तर तुम्हाला OTP पाठवला जाईल. हा OTP रजिस्टर्ड ई मेल आयडीवर पाठवला जातो. जर तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर तुम्हाला OTP येणार नाही. (हेही वाचा : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त) असा अपडेट करा मोबाइल नंबर आधार सेवा केंद्रात जाऊन तुम्ही तुमचा मोबाइल नंबर अपडेट करू शकता. त्यासाठी 50 रुपये खर्च येईल. त्याचवेळी आधारशी संबंधित सेवा हवी असेल तरीही आधार सेवा केंद्रातून तुम्हाला ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येईल. ==========================================================================================

)







