PF खातेधारकांनी हे करायलाच हवं, नाही तर मिळणार नाहीत पैसे

PF काढण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 05:40 PM IST

PF खातेधारकांनी हे करायलाच हवं, नाही तर मिळणार नाहीत पैसे

मुंबई, 29 एप्रिल : नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडामधून पैसे काढणं सोपं झालंय. याचं मुख्य कारण तुम्ही आॅनलाइन क्लेम करू शकता. पण अजून तरी 50 टक्के कर्मचाऱ्यांनी आपली KYC युनिव्हर्सल नंबराला ( UAN ) जोडलेली नाही. त्यामुळे पीएफ खाताधारक EPFOचा आॅनलाइन सेवेचा फायदा घेऊ शकणार नाही. सरकारनं ईपीएफओच्या सीमेत येणाऱ्या कंपनीज आणि संस्थांच्या पीएफधारकांना KYC 100 टक्के पूर्ण करायला सांगितलंय.

KYC केल्यानं होणारा फायदा

ज्या खात्यात KYC पूर्ण झालंय, त्यात PFचे पैसे लगेच ट्रान्सफर होणार आहेत.

PF खात्यात बँक डिटेल्स नसतील, तर क्लेम रिक्वेस्ट रद्द होऊ शकते.

तुम्हाला SMSद्वारे कुठलाही अलर्ट मिळणार नाही.

Loading...

ईपीएफओ युएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जाऊन तुम्ही KYC अपडेट करू शकता.

कशी कराल  KYC?

त्यासाठी तुम्हाला UAN पोर्टल वापरावं लागेल.

पहिल्यांदा तुम्ही या वेबसाइटवर जा आणि KYC या पर्यायावर क्लिक करा.

नंतर पॅन, आधार, मोबाइल नंबर, बँक अकाउंट या सेक्शनमध्ये जाऊन एक एक पर्यायावर क्लिक करा.

तुमची माहिती भरा आणि सबमिट करा.

तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल. ते पडताळून पाहायला तुम्ही तुमच्या मालकाला सांगा.

ते व्हेरिफाय झालं की आॅनलाइन सुविधा सुरू होईल.

या कागदपत्रांची आहे गरज

युएएनशी संबंधित केवायसीमध्ये आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, पॅन आणि मोबाइल नंबर लागतो.

जेव्हा PF खातेधारक केवायसी युएएनसोबत लिंक करतो, तेव्हा PFसंबंधी माहिती मोबाइलवर मिळवू शकतो.

लगेच काढता येतील पैसे

तुम्हाला PF काढायचा असेल आणि KYC अपडेट असेल तर 3 दिवसांत पैसे मिळू शकतात.


VIDEO : शाहरुख खान सहकुटुंब पोहोचला मतदानाला!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: EpfoPf
First Published: Apr 29, 2019 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...