EPFO Update: आधार-UAN लिंक करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट, आता ही असणार डेडलाइन

EPFO Update: आधार-UAN लिंक करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट, आता ही असणार डेडलाइन

EPFO ने अशी माहिती दिली आहे की सर्व सब्सक्रायबर्स 1 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांचे आधार यूएएनशी लिंक करू शकतात. EPFO ने ही डेडलाइन तीन महिन्यांनी वाढवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जून: नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचं UAN आणि आधार अद्याप लिंक केलेलं नसेल (Aadhaar-linking with UAN) तर चिंता करण्याची काही गरज नाही आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अशी माहिती दिली आहे की सर्व सब्सक्रायबर्स 1 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांचे आधार यूएएनशी लिंक करू शकतात. EPFO ने ही डेडलाइन तीन महिन्यांनी वाढवली आहे. देशभरातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार सूत्रांनी अशी माहिती दिली आहे कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे ही बाब अनेकदा कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासमोर मांडण्यात आली, त्यानंतर त्यांनी डेडलाइन अर्थात अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

15 जून रोजी सर्क्यूलर जारी

सरकारने यासंदर्भात 15 जून रोजी सर्क्यूलर जारी करत माहिती दिली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की UAN आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे वाचा-शेतकऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार देत आहे 4000 रुपये मिळवण्याची संधी,वाचा सविस्तर

अन्यथा नाही मिळणार पीएफचे पैसे

तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते. सब्सक्रायबर्सचे UAN  (Universal account number) आधारसह लिंक असणं आवश्यक आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केला आहे. यामुळे ECR फाइलिंग प्रोटोकॉल बदलला आहे. आता ही डेडलाइन 1 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. पूर्वी 1 जून 2021 ही UAN-Aadhar लिंक करण्याची अंतिम तारीख होती.

आधारशी तुमचे UAN कसं जोडाल?

-सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा

-याकरता https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यावर क्लिक करू शकता.

-यानंतर UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा

हे वाचा-1 वर्षाच्या FD वर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, वाचा काय आहेत इंटरेस्ट रेट्स

-त्यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC या पर्यायावर क्लिक करा

-याठिकाणी तुम्हाला EPF अकाउंटमध्ये आधारसह कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते दिसेल

-याठिकाणी आधारचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधारवरील तुमचं नाव टाइप करुन सर्व्हिसवर क्लिक करा

-यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल आणि तुमचं आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल

-तुम्ही दिलेली कागदपत्र योग्य असल्यास तुमचं आधार EPF खात्याशी लिंक होईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 16, 2021, 11:43 AM IST

ताज्या बातम्या