मराठी बातम्या /बातम्या /मनी /IBM टेक कंपनी सोडून दोन महिलांनी थाटला स्वतःचा बिझनेस, बनवतायत एडिबल कटलरी

IBM टेक कंपनी सोडून दोन महिलांनी थाटला स्वतःचा बिझनेस, बनवतायत एडिबल कटलरी

रेस्टॉरंट्समध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यांचा (Plastic Cutlery) वापर केला जातो. ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आलीत का हे पाहणं आपल्याला शक्य नसतं. याचा विचार करुनच बंगळुरूतील एक स्टार्टअप कंपनी ‘एडिबलप्रो’ने (EdiblePRO) प्लॅस्टिक भांड्यांना उत्तम पर्याय दिला आहे.

रेस्टॉरंट्समध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यांचा (Plastic Cutlery) वापर केला जातो. ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आलीत का हे पाहणं आपल्याला शक्य नसतं. याचा विचार करुनच बंगळुरूतील एक स्टार्टअप कंपनी ‘एडिबलप्रो’ने (EdiblePRO) प्लॅस्टिक भांड्यांना उत्तम पर्याय दिला आहे.

रेस्टॉरंट्समध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यांचा (Plastic Cutlery) वापर केला जातो. ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आलीत का हे पाहणं आपल्याला शक्य नसतं. याचा विचार करुनच बंगळुरूतील एक स्टार्टअप कंपनी ‘एडिबलप्रो’ने (EdiblePRO) प्लॅस्टिक भांड्यांना उत्तम पर्याय दिला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: कोरोना महामारीमध्ये रेस्टॉरंट बिझनेसवर मोठ्या प्रमाणात (Restaurant business during Corona) परिणाम झाला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट बंद ठेवावं लागणं किंवा अर्ध्या क्षमतेनी सुरू ठेवणं अशा नियमांमुळे ग्राहक नाहीत. त्यात जे ग्राहक येतात त्यांनाही हायजीनबाबत असलेली भीती. बहुतांश रेस्टॉरंट्समध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यांचा (Plastic Cutlery) वापर केला जातो. ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आलीत का हे पाहणं आपल्याला शक्य नसतं. तसेच, वारंवार विविध लोकांचे हात या भांड्यांना लागल्यामुळे त्यातून विषाणूचा संसर्ग होण्याची भीतीही असते. याचा विचार करुनच बंगळुरूतील एक स्टार्टअप कंपनी ‘एडिबलप्रो’ने (EdiblePRO) प्लॅस्टिक भांड्यांना उत्तम पर्याय दिला आहे.

एडिबलप्रोने तयार केलेल्या भांड्यांची खासियत म्हणजे, ही भांडी ‘यूज अँड थ्रो’ नाहीत, तर ‘यूज अँड इट’ (Ediable Cutlery) अशी आहेत. या भांड्यांच्या सेटमध्ये मिळणारी कटलरी तुम्ही जेवणासाठी वापरू शकता, आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही ही कटलरी चक्क खाऊ (Cutlery you can eat) शकता. या सेटमधील ताट (Edible Plate), वाटी, चमचा (Edible spoon) आणि ग्लासही एडिबल (Edible glass), म्हणजेच खाण्यायोग्य आहेत. शैला गुरुदत्त आणि लक्ष्मी भीमाचार यांनी आयबीएम (IBM) या मोठ्या आयटी कंपनीतील नोकरी सोडून हा स्टार्टअप (Bengaluru start-up EdiblePRO) सुरू केला आहे.

शैला आणि लक्ष्मी सांगतात, की एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक कटलरीला एडिबलप्रो रिप्लेस करू शकते. एडिबलप्रो 80 हून अधिक कटलरी प्रॉडक्ट्स (more than 80 cutlery products) बनवते. ही प्रॉडक्ट्स खूप स्वस्त आहेत. तसंच, ती रुचकर आणि पौष्टिकही (Healthy cutlery) आहेत असा दावा शैला आणि लक्ष्मींनी केला आहे. त्यांनी 2018 मध्ये याची सुरुवात केली होती.

1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा लाखोंचा फंड, वाचा काय आहेत Investment साठी पर्याय?

एडिबलप्रोच्या संशोधनामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) मोठ्या प्रमाणात मदत झाली. शैला यांनी पीठ आणि इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर प्रयोग करत विविध प्रॉडक्ट्स बनवले. बंगळुरूमधील एफएसएसएआय सर्टिफाईड प्रयोगशाळेकडून (FSSAI certified lab) या प्रॉडक्ट्सच्या नमुन्यांना मंजुरी मिळाल्यानंतर या दोघींनी कंपनी रजिस्टर केली.

RBI ने या बँकेवर ठोठावला 1 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

या प्रॉडक्ट्समध्ये हानीकारक रंगांचा वापर केला जात नाही. बीट, गाजर, पालक अशाच अनेक फळांपासून वा भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या रंगांचा वापर (natural colours for cutlery) या कटलरीमध्ये केला जातो. गहू, बाजरी, डाळी आणि मसाला अशा गोष्टींचा वापर करुन ही कटलरी तयार केली जाते. या सर्व गोष्टी थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात. सर्व प्रॉडक्ट्स पलानहल्लीमध्ये तयार होतात, ज्यामुळे स्थानिक महिलांनाही रोजगार मिळतो. या सर्व प्रॉडक्ट्सची शेल्फ लाईफ सहा महिने (EdiblePRO shelf life) आहे. ही सर्व कटलरी तुम्ही न शिजवता तशीच खाऊ शकता. या प्रॉडक्ट्सची किंमत 2 रुपयांपासून 155 रुपयांपर्यंत (EdiblePRO price) असल्याची माहिती शैला आणि लक्ष्मींनी दिली.

First published:

Tags: Business, Money