ONGC तोट्यात; येत्या वर्षात 'या' दोन कंपन्या विलिन होणार!

ONGC तोट्यात; येत्या वर्षात 'या' दोन कंपन्या विलिन होणार!

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) दोन रिफायनरी कंपन्या विलिन होणार आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) या ONGCच्या कंपन्यांचं विलिनीकरण होणार आहे. एका रिपोर्टनुसार, जून 2021 पर्यंत ONGC या दोन्ही कंपन्याच्या विलिनीकरणावर विचार करणार आहे. ONGCचे अध्यक्ष शशि शंकर यांनी ही माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्याचं विलिनीकरण जून 2021 नंतर करणार असल्याचं ते म्हणाले.

वाचा - Indian Railwayचं लक्ष्य;ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये मिळवणार 30 टक्के भागीदारी

विलिनीकरणामुळे काय फायदा होणार -

शशि शंकर यांनी सांगितलं की, HPCL आपल्या कंपन्यांमध्ये जितकं उत्पादन करते, त्याहून अधिक इंधानाची विक्री करते. तर दुसरीकडे MRPL पूर्णपणे एक रिफायनिंग कंपनी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) सोबत विलिनीकरण तर्कसंगत आहे. HPCL इंधनाच्या मार्केटिंगमध्ये संतुलन साधण्यास मदत करेल. तसंच HPCLला इतर कंपन्यांकडून इंधन घेण्याची गरज भासणार नाही.

वाचा - Coronavirus: प्रदूषण वाढल्यास, कोरोना रुग्णांची संख्याही वाढेल; एम्सकडून इशारा

ONGC -

ONGCने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नॅच्युरल गॅस व्यवसायात जवळपास 6000 ते 7000 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ONGCला हे नुकसान होत आहे, ज्यात इंधनाचे दर जवळपास दशकांच्या निचांकी पातळीवर पोहचले आहेत. सरकारने ठरवलेली किंमत उत्पादन खर्चापेक्षा अतिशय कमी असल्याचं कंपनीचे आर्थिक संचालक सुभाष कुमार यांनी सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: October 11, 2020, 1:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या