या महिन्याच्या शेवटी बदलेल तुमच्या टीव्हीचा सेटटाॅप बाॅक्स, कारण...

या महिन्याच्या शेवटी बदलेल तुमच्या टीव्हीचा सेटटाॅप बाॅक्स, कारण...

Jio, Dish Tv - थोड्याच दिवसात तुमच्या टीव्हीच्या केबल कनेक्शनमध्ये बदल होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : या महिन्याच्या शेवटापर्यंत दोन मुख्य डीटीएच (DTH) कंपन्यांचं विलीनीकरण होऊ शकतं. एस्सेल ग्रुपच्या डिश टीव्हीची खरेदी लवकरच भारती एअरटेल करणार आहे. या विलीनीकरणानंतर एअरटेल डिजिटल टीव्ही देशातली सर्वात मोठी डीटीएच कंपनी बनेल. विलीनीकरणानंतर टाटा स्काय आणि जिओला टक्कर देईल. याच महिन्यात रिलायन्सही आपल्या गिगाफायबर सर्विसला व्यावसायिक पद्धतीनं सुरू करणार आहे.

एअरटेलचे मालक सुनील भारती मित्तल यांनी मार्चमध्येच देशाची सर्वात मोठी कंपनी डीटीएच कंपनी डिश टीव्हीच्या विलीनीकरणाबद्दल बोलणं सुरू केलेलं. ही बोलणी आता शेवटच्या टप्प्यात आहेत. दोन्ही कंपन्या लवकरच याची घोषणा करतील.

सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही झाली महाग, 'हे' आहेत गुरुवारचे दर

जिओनं डेन केबल नेटवर्क आणि हॅथवेमध्ये खरेदी केली भागीदारी

रिलायन्स जिओनं नुकतीच देशातली सर्वात मोठी केबल टीव्ही कंपनी डेन नेटवर्क आणि हॅथवे केबल अँड डाटाकाॅममध्ये मुख्य भागीदारी खरेदी केलीय. मित्तल आता डीटीएचमध्येही जिओला टक्कर देण्याच्या विचारात आहेत.

सौर पॅनल लावून करा घरबसल्या कमाई, 'असे' मिळवता येतील पैसे

पाकिस्तानात हाहाकार! भारताच्या दुप्पट किमतीत विकलं जातंय सोनं

डीटीएचची सर्वात मोठी कंपनी डिश टीव्ही

TRAI च्या आकडेवारीनुसार डिश टीव्हीची बाजारात 37 टक्के हिस्सेदारी आहे. दुसऱ्या नंबरवर टाटा स्काय 27 टक्के आणि तिसऱ्या नंबरवर एअरटेल डिजिटल टीव्ही 24 टक्के आहे. विलीनीकरण झालं तर दोन्ही कंपन्यांकडे एकूण 3.9 कोटी ग्राहक होतील. यानंतर कंपनीचा बाजारातला हिस्सा 61 टक्के होईल.

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: DTH
First Published: Aug 8, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या