मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold ETF मध्ये गुंतवणूकदारांचं आकर्षण कायम; नोव्हेंबरमधील गुंतवणूक 683 कोटींवर

Gold ETF मध्ये गुंतवणूकदारांचं आकर्षण कायम; नोव्हेंबरमधील गुंतवणूक 683 कोटींवर

गोल्ड ईटीएफमध्ये ऑक्टोबरमध्ये  303 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली होती, तर सप्टेंबरमध्ये ती 446 कोटी रुपये होती. गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 24 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 12 डिसेंबर : गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफकडे (Gold ETF) गुंतवणूकदारांचे आकर्षण (Investors) कायम आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 683 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. सोन्याच्या किंमतीतील (Gpld Price) 'करेक्शन' आणि कोरोना व्हायरसच्या नवीन वेरिएंट, ओमिक्रॉनच्या (omicron) धोक्यांदरम्यान गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफकडे कल वाढला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच Amfi च्या डेटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 303 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली होती, तर सप्टेंबरमध्ये ती 446 कोटी रुपये होती. गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 24 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती.

तुमच्या Adhaar card वर दुसरं कुणी सिम वापरतंय का? दोन मिनिटात करा चेक

तज्ञ काय सांगतात?

LXME च्या संस्थापक प्रीती राठी गुप्ता म्हणाल्या की, गोल्ड ईटीएफमध्ये नोव्हेंबरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड-19 च्या नव्या वेरिएंटमुळे अर्थव्यवस्थेची चिंता वाढली आहे. बाजारातील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार बचत करण्याच्या पारंपरिक पद्धतीकडे वळत आहेत.

मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक-व्यवस्थापक संशोधन हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या किमतीतील 'करेक्शन' आणि ओमिक्रॉनच्या चिंतेमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले आहे.

सोशल मीडिया स्टारची आत्महत्या; अपमानास्पद कमेंट्स, ट्रोलिंगमुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीचा आकडा यावर्षी 4,500 कोटी रुपयांवर

ताज्या इनफ्लोनंतर, गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीचा आकडा यावर्षी 4,500 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यावर्षी जुलै महिन्यात गोल्ड ईटीएफमधून 61.5 कोटी रुपये काढण्यात आले.

First published:

Tags: Investment, Money