मुंबई, 10 जुलै : रेल्वेनं प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आणलीय. भारतीय रेल्वेनं आॅक्टोबरपासून रोज 4 लाख एक्स्ट्रा बर्थ दिलेत. म्हणजे या दिवाळीत बाहेरगावी जाण्यासाठी तिकीट मिळण्याचं टेन्शन राहणार नाही. रेल्वे आॅक्टोबरपासून नवी टेक्नाॅलाॅजी वापरणार आहे. म्हणून प्रवाशांना सीट उपलब्ध होण्यात अडचण येणार नाही. रेल्वे आॅक्टोबरपर्यंत सर्व एलएचबी कोचमध्ये हाॅटल लोड जनरेशन सिस्टम लावणार आहे. हे तंत्र ट्रेनमधून पाॅवर कार जनरेटर काढणार आहे. त्या जागी प्रवाशांसाठी नवे कोच लावले जातील.
नव्या तंत्रानं 5 हजार एक्स्ट्रा कोच लावले जातील
एलएचबी कोचमध्ये हाॅटल लोड शेड जनरेशन (HOG ) सिस्टिम सुरू झाल्यानंतर ट्रेनच्या इंजिनमधून वीज मिळवली जाईल. या विजेतून कोचमधला एसी, लाइट आणि इतर उपकरणं चालतील. सध्या विजेसाठी ट्रेनच्या पुढे-मागे दोन पाॅवर कार जनरेटर लावलेले असतात.
फोनमध्ये इंटरनेट नाही? तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे
HOG तंत्रामुळे पाॅवर कार जनरेटर काढून टाकला जाईल. नव्या टेक्नाॅलाॅजीमुळे आॅक्टोबर 2019पासून 5 हजार जादा कोच ट्रेनमध्ये लावले जातील. यामुळे प्रवाशांना 4 लाखांहून जास्त बर्थ मिळू शकतील.
या तंत्रामुळे रेल्वेची दर वर्षी 6 हजार कोटी बचत होईल. इंथन खर्चात 6 हजार कोटी बचत होईल. नाॅन एसी कोचमध्ये वीज पुरवठ्यासाठी 40 लीटर प्रति तास डिझेल लागतं तर एसी कोचमध्ये 65-70 लीटर प्रति तासाला डिझेलचा खप होतो.
रेल्वेमध्ये आहेत 500हून जास्त व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज
शताब्दी एक्सप्रेसमध्ये वीजेसाठी दोन डिझेल जनरेटर लावलेत. एचओजी सिस्टम वापरल्यानंतर फक्त एक पाॅवर कार ट्रेनमध्ये लावली जाईल. पण ती चालणार नाही. एका पाॅवर कार जागी जादा कोच लावले जातील. तेही ट्रेनची लांबी न वाढवता. LBH कोचरमध्ये ही सिस्टिम लागू झाल्यानं 4 लाखाहून जास्त बर्थ प्रवाशांना मिळतील.
SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अॅम्ब्युलन्सला वाट करून देते!